ज्येष्ठ नागरिकांचा वार्षिक मेळावा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्यातर्फे दरवर्षी ऑक्टोबरमध्ये एक विशिष्ट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या व फेस्कॉमच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा केंद्र इमारतीच्या मुख्य सभागृहामध्ये आयोजित केला जातो. त्या मेळाव्यामध्ये दोन पुरुष व दोन महिला ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येतो. सत्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गौरव पत्र असे असते. तसेच प्रवासासाठी रु. १५००/- दिले जातात. सत्कार समारंभाच्या आधी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात येते. कार्यक्रम सर्वसाधारणपणे सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत चालतो.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft