ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा २०१६ संपन्न..

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमुंबई यांच्यातर्फे दरवर्षी ऑक्टोबरमध्ये एक विशिष्ट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या व फेस्कॉमच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळाव्याचे आयोजित केला जातो. त्या मेळाव्यामध्ये दोन पुरुष व दोन महिनला ज्येष्ठ नागरिकांना सत्कार करण्यात येतो. यावर्षी रविवार दि. १६ ऑक्टोबर २०१६ रोजी चव्हाण केंद्रामध्ये ब्रांदा ते दहिसर या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघटनांचा मेळावा भरविण्यात आला. मेळाव्याचे अध्यक्ष श्री. शरद काळे हे होते व प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक मा. डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते. अंदाजे ४०० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात उपस्थित होते.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft