ग्रंथालयाचे नियम

यशवंतराव चव्हाण ग्रंथालयाचे सभासद होण्याकरिता नमुना अर्ज तयार केला आहे. या अर्जामध्ये स्वत:च्या हस्ताक्षरात परिपूर्ण माहिती भरून त्यासोबत पुढीलप्रमाणे वर्गणी भरणे आवश्यक आहे.

अ) सर्वसाधारण सभासद :
सर्वसाधारण सबासदाकरिता रु. २५०/- वार्षिक वर्गणी तसेच रु. २५०/- अनामत रक्कम ( १९९६ पासून )

ब ) विद्यार्थी सभासद :
महाविद्यालयीन / उच्चशिक्षण / संशोधक विद्यार्थ्यांकरिता वार्षिक रु. ५०/- नाममात्र वर्गणी व अनामत रक्कम रु. १००/- ( दि. १-८-०८ पासून )

क) यशवंतराव चव्हाण ग्रंथालयामध्ये संदर्भाकरिता काही विद्यार्थी एक आठवडा, एक महिना या कालावधीकरिता ग्रंथालयाचा लाभ घेतात. या विद्यार्थ्यांकडून रु. ५०/- एका आठवड्याला व एक महिन्याला फी आकारण्यात येते. त्यांच्याकडून फक्त एका कार्डवर त्यांची वैयक्तिक माहिती भरून घेण्यात येते.

ड) माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी शिक्षण घेणारे विद्यार्थी संगणकविषयक पुस्तकांचा लाभ घेतात. त्याकरिता ग्रंथालय वेगळी फी आकारत नाही.

इ-१) संयुक्त संस्था सभासदत्व - कार्पोरेट या शब्दाच्या व्याख्येत बसणारी संस्था या सभासदत्वासाठी पात्र असेल. एकावेळची वर्गणी रु. ५०,०००/-, ५ वर्षासाठी.

अनामत रक्कम : सर्वसाधारणपणे अनामत रक्कम घेण्यात येणार नाही. परंतु एखाद्या दुर्मीळ व किंमती पुस्तकासाठी प्रतिष्ठान निश्चित करेल तेवढी रक्कम घेण्यात येईल.
एका वेळी देण्यात येणारी पुस्तके : एकावेळी जास्ती जास्त १० पुस्तके देता येतील.

   

   

राष्ट्रीय ग्रंथालय संपर्क  

श्री. अनिल पाझारे
ग्रंथालय संसाधन व ज्ञान व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft