कृषी व सहकार व्यासपीठ

कृषी व सहकार विषयातील तज्ज्ञ, शेतकरी आणि या क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना एका व्यासपीठावर एकत्र आणून त्यांच्यामध्ये साधक बाधक चर्चा घडवून सकारात्मक बदल घडावा याकरिता हे व्यासपीठ कार्यरत आहे. चर्चासत्रे, मेळावे, व्याख्याने इत्यादी कार्यक्रम या व्यासपीठामार्फत आयोजित केले जातात. धोरणात्मक मुद्द्यांसोबतच शेती व सहकारासंबंधी काम करताना येणा-या अडचणी यांचा यामध्ये समावेश असतो.

कृषी व सहकार व्यासपीठाचे काम पुणे कार्यालयातून चालते. श्री. अजित निंबाळकर अध्यक्ष म्हणून काम पाहतात. व्यासपीठाला श्री. अंकुशराव काकडे यांचे मार्गदर्शन लाभते. दैनंदिन कामकाज श्री. शं. त्रि. भिडे पाहत असून त्यांना प्रा. प्र. त्र्यं. पंडित, श्री. सुनिल कदम व
श्री. रवि सरनाईक यांची मदत होते.

   

कृषी व सहकार व्यासपीठ  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft