कायद्यासाठी हस्ताक्षर हा पुरावा असतो - हस्ताक्षरतज्ज्ञ डॉ. अँड. शैलेश चांदजकर.

IMG 20190130 174732


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, कायदे विषयक सहाय्य व सल्ला फोरमच्या वतीने " आपला कायदा जाणून घ्या" व्याख्यानमालेच्या अंतर्गत तिस-या पुष्पात "गुन्हा, पुरावा, हस्ताक्षर आणि कायदा" या विषयावर हस्ताक्षर तज्ज्ञ डॉ. अँड. शैलेश चांदजकर व्याख्यान बुधवार दिनांक ३० जानेवारी २०१९ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडले. 


अँड. शैलेश चांदजकर यांनी आपल्या व्याख्यानात स्वाक्षरी कशी असली पाहिजे तसेच कोर्टामध्ये स्वाक्षरी पेक्षा अंगठ्याचे ठसे हा पुरावा अधिक ग्राह्य धरला जातो. स्वाक्षरीवरुन स्वभाव ओळखता येतो. स्वाक्षरी करण्यासाठी महात्मा गांधी त्यावेळी पाच रुपये घेत असत ते पाच रुपये हरिजन फंडासाठी वापरले जात असत. तसेच शरद पवार यांच्या स्वाक्षरीमध्ये डॉट असतो असे त्यांनी सांगितले. शरद पवार यांना पेन जमविण्याचा छंद असल्याचे त्याविषयी दालन बारामतीमध्ये आपणास पहायला मिळू शकते. हस्ताक्षरावरुन गुन्हा सिद्ध केला जाऊ शकतो परंतु काँप्युटरमध्ये केलेले टायपिंग मध्ये फॉन्ट व साईज एकाच प्रकारची असल्यामुळे ते सिद्ध करणे फार अवघड असते असे त्यांनी सांगितले. सराईत गुन्हेगार हे काही लिहिण्यासाठी पेन्सिलचा वापर करतात असे यावेळी बोलताना ते म्हणाले. अशा वेळवेगळ्या विषयावर त्यांनी प्रकाश टाकला. प्रशोत्तराचा तासही तेवढाच रंगला.

कायदे विषयक सहाय्य व सल्ला फोरम वतीने
"हस्ताक्षर आणि कायदा" व्याख्यानाचे आयोजन...

law banner
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, कायदे विषयक सहाय्य व सल्ला फोरमच्या वतीने " आपला कायदा जाणून घ्या" व्याख्यानमालचे अंतर्गत तिस-या पुष्पात "हस्ताक्षर आणि कायदा" या विषयावर हस्ताक्षर तज्ज्ञ मा. डॉ. शैलेश चांदजकर व्याख्यान बुधवार दिनांक ३० जानेवारी २०१९ रोजी सायं ५.०० वाजता स्थळ बेसमेंट हॉल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठन, जन जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखान्याच्याबाजूला, मुंबई -२१ येथे होणार असून या व्याख्यानास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरमच्या वतीने करण्यात आले आहे.

   

विधी सल्लागार व सदस्य सचिव  

श्री. म. बा. पवार
विधी सल्लागार व सदस्य सचिव,
कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम,
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- ०२२-२२०२८५९८ / ०२२-२२८५२०८१


   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft