न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांना आदरांजली...

51255428 1056280141246964 2226052210595201024 o

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम च्या वतीने दिनांक २ फेब्रुवारी २०१९ रोजी दिवंगत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांची आदरांजली सभा आयोजित करण्यात आली होती.
आपल्या कामाबरोबरच आपण समाजकार्य करायला पाहिजे असा त्यांचा मानस होता. हुंडा विरुद्ध मोहिमेत त्यांचे विशेष योगदान होते. स्त्रियांप्रति असलेला त्यांचा आदर यासाठी ते ओळखले जायचे. जीवनाची परीक्षा नंतर होईल आधी आपण आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत, अशी त्यांची शिकवण होती.

यावेळी त्यांचे सुपुत्र न्यायमूर्ती सत्यरंजन चंद्रशेखर धर्माधिकारी, न्यायमूर्ती डी. आर. धानुका, न्यायमूर्ती सुजाता वसंत मनोहर, न्यायमूर्ती अभय महादेव ठिपसे, न्यायमूर्ती एस. एस. पारकर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान चे सरचिटणीस श्री. शरद काळे आदी उपस्थित होते. सर्वांनी त्यांच्याशी जोडलेल्या जुन्या आठवणी सांगितल्या. त्यांची शिकवण , त्यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांची काम करण्याची पध्दत, लोकांना जोडून ठेवायची कला अशा अनेक आठवणींना उजाळा दिला.

दिवंगत मा. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी
यांच्या आदरांजली सभेचे आयोजन..

chandarshekar dयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम च्या वतीने दिनांक २ फेब्रुवारी २०१९ रोजी दिवंगत मा. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या आदरांजली सभेचे आयोजन रंगस्वर सभाग्रृह, यशवंतराव चव्हाण केंद्र, ४ था मजला, जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०००२१ येथे सायंकाळी ४.४५ वा. करण्यात आले आहे.

   

विधी सल्लागार व सदस्य सचिव  

श्री. म. बा. पवार
विधी सल्लागार व सदस्य सचिव,
कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम,
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- ०२२-२२०२८५९८ / ०२२-२२८५२०८१


   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft