विधी साक्षरता कार्यशाळा संपन्न...

Untitled 1

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम, मुंबई व ठाणे सद कॅम्पस, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २४ फेब्रुवारी रोजी एम.एस. डब्ल्यु. (मास्टर ऑफ सोशल वर्क) च्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय ‘विधी साक्षरता कार्यशाळा’ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, खारघर येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये भारतीय संविधान व पर्यावरण विषयक तरतुदी, महिला व बालक यांच्या लैंगिक शोषणाविरोधी कायदेशीर तरतुद, बाल गुन्हेगारी संबंधित परिस्थिती आणि कायदेशीर तरतुदी, ज्येष्ठ नागरीकांसंबंधी विविध तरतुदी, ग्राहक संरक्षण विषयक तरतुदी व उपाय या पाच विषयांवर मराठी व इंग्रजी भाषांमध्ये व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. नेमका कायदा काय असतो त्याविषयी सखोल ज्ञान मिळावे म्हणून सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. एम.एस. डब्ल्यु. (मास्टर ऑफ सोशल वर्क) च्या जवळपास ९० विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थिती दर्शवली. त्याच्याकडून संविधान सरनाम्याचे सामूहिक वाचन करवून घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना कार्यशाळेचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरमचे सचिव विनायक कांबळे अॅड. प्रमोद ढोकळे, अॅड. प्रॉस्पर डिसुजा, अॅड.प्रकाश धोपटकर, अॅड. भूपेश सामंत, अॅड. डॉ. प्रकाश देशमुख, आदि उपस्थित होते.

 

"मास्टर ऑफ सोशल वर्क"च्या विद्यार्थ्यांसाठी
विधी साक्षरता कार्यशाळा...

BANNER 24022019

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ,कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम व ठाणे सद कॅम्पस, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने "विधी साक्षरता कार्यशाळा" एम.एस. डब्ल्यु. (मास्टर ऑफ सोशल वर्क) च्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक २४ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १० ते सायं ६ वाजेपर्यंत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ रघुनाथ विहार, सेक्टर १४, खारघर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा दोन सत्रामध्ये असून पहिल्या सत्रामध्ये स्वागत, परिचय, पुष्पगुच्छ प्रदान, प्रास्ताविक, संविधान सरनाम्याचे सामूहिक वाचन, हुंडाबंदी शपथ यामध्ये मुख्य व्याख्याते असणार आहेत अँड. प्रमोद ढोकळे (भारतीय संविधान, पर्यावरण विषयक तरतूदी ), अँड. प्राँस्पर डिसुजा (महिला व बालक यांच्या लैगिक शोषणाविरोधी कायदेशीर तरतुद), अँड., प्रकाश धोपटकर (बाल गुन्हेगारी संबंधित परिस्थिती आणि कायदेशीर तरतुदी ) तर दुस-या सत्रामध्ये अँड. भूपेस सामंत (ज्येष्ठ नागरीकांसंबंधी विविध तरतूदी), अँड.. डॉ. प्रकाश देशमुख ( ग्राहक संरक्षण विषयक तरतूदी व उपाय ) अशा वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. कार्यशाळेची सांगता अध्यक्षीय भाषण व आभार प्रदर्शनाने होईल.

   

विधी सल्लागार व सदस्य सचिव  

श्री. म. बा. पवार
विधी सल्लागार व सदस्य सचिव,
कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम,
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- ०२२-२२०२८५९८ / ०२२-२२८५२०८१


   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft