विधी साक्षरता कार्यशाळा संपन्न...

WhatsApp Image 2019 12 23 at 9.56.07 AM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम व निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क, गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी मोफत एक दिवसीय विधी साक्षरता कार्यशाळेचे निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क येथे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक व्यक्तीला आपले राज्य काय, आपली प्रतिज्ञा काय अशा बाबींची माहिती मिळावी, त्याचा विचार व्हावा, यासाठी कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम मार्फत सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. महिला व बालके याबाबत कायद्याची पार्श्वभूमी, महिलांवरील विविभ प्रकारे होणारे अत्याचार व उपाय, मुलांसाठीचे लैंगिक प्रतिबंध कायदा, महिलांचे अश्लील देह प्रदर्शन प्रतिबंधक कायदा १९८६, हिंदू विवाह कायदा, वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायदा याविषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेला उपस्थितांकडून संविधान सरनाम्याचे सामूहिक वाचन करवून घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना कार्यशाळेचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरमचे सचिव विनायक कांबळे, दिलीप तळेकर, प्रॉस्पर डिसोजा, प्रकाश धोपटकर, जे. बी. पाटील, भूपेश सामंत आदि उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीत घेऊन कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

   

विधी सल्लागार व सदस्य सचिव  

श्री. म. बा. पवार
विधी सल्लागार व सदस्य सचिव,
कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम,
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- ०२२-२२०२८५९८ / ०२२-२२८५२०८१


   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft