जीवनदीप महाविद्यालयात पार पडली विधी साक्षरता कार्यशाळा...

WhatsApp Image 2020 01 25 at 5.53.45 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, मोफत कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरमच्या वतीने जीवनदीप महाविद्यालय, गोवेली, ता. कल्याण, जि. ठाणे येथे विधी साक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांकडून संविधान सरनाम्याचे सामूहिक वाचन करवून घेण्यात आले.
पहिल्या सत्रात चार व्याख्याने पार पडली. अॅड. प्रकाश धोपटकर यांनी अल्पवयीन मुलांवरील अत्याचार व बालगुन्हेगारी या विषयावर बालकांवर जे अन्याय होतात त्यापासून कसं संरक्षण मिळावं या संदर्भातील कायदा व्याख्यान दिले. अॅड. दिलीप तळेकर यांनी महिलांवरील अत्याचार व सुरक्षिततेचे कायदे याविषयावर व्याख्यान दिले. अॅड. भूपेश सामंत यांनी मानसिक स्वास्थ्य अधिनियम - १९८७ तर अंधश्रद्धा निर्मुलन आणि जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर अॅड. विनायक कांबळे यांच्या व्याख्यानाने पहिल्या सत्राची सांगता झाली.
दुस-या सत्रात अॅड. प्रॉस्पर डिसोझा यांनी सायबर कायद्याविषयी व्याख्यान दिले. अॅड. जगन्नाथ पाटिल यांनी शिक्षणाचा हक्क आणि कायदे याविषयावर व्याख्यान दिले.
उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शेवटी अध्यक्षीय भाषणाने आभार प्रदर्शन करुन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

विधी साक्षरता कार्यशाळा संपन्न...

WhatsApp Image 2020 01 11 at 10.42.45 PM
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम व जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खर्डी, वळखण, ता. शहापूर, जि. ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ११ जानेवारी रोजी मोफत एक दिवसीय विधी साक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला उपस्थितांकडून संविधान सरनाम्याचे सामूहिक वाचन करवून घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना कार्यशाळेचे प्रमाणपत्र देण्यात आले.

   

विधी सल्लागार व सदस्य सचिव  

श्री. म. बा. पवार
विधी सल्लागार व सदस्य सचिव,
कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम,
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- ०२२-२२०२८५९८ / ०२२-२२८५२०८१


   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft