३३ व्या पुण्यतिथी निमित्त भव्य पदयात्राकराड : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र कराड यांच्या संयुक्त विद्यमाने देशनेते यशवंतरावजी चव्हाण यांची ३३ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शनिवारी २५ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ४ वाजता कराड मध्ये भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. पदयात्रा मार्ग विरंगुळा-विजय चौक-टिळक हायस्कूल-कन्याशाळा-चावडी चौक-समाधी स्थळ असा असेल. त्यानंतर समाधी स्थळी पुष्पांजली व सन्माननियांची आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम होईल. भव्य पदयात्रे मध्ये अधिक लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटिल आणि मोहनराव कृष्णाजी डकरे यांनी केले आहे.

'विरंगुळा'येथे १०४ वी जयंती उत्साहात

कराड : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची कराड मध्ये मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला कराड आणि सातारा परिसरातून मोठ्या अधिक प्रमाणात लोकांची गर्दी होती. सुरूवातीला चव्हाण साहेबांच्या निवासस्थानी 'विरंगुळा' येथे त्यांचे पुतणे अशोकराव गणपतराव चव्हाण यांनी प्रतिमांना पुष्पहार घातला. यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स आणि सौ. वेणूताई कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ यांनी विजय चौक, दत्त चौक, आझाद चौक, नेहरू चौक, चावडी चौक आणि कृष्णा नदी अशी पदयात्रा काढली. पी. डी. पाटील प्रतिष्ठानच्या वतीने कराड शहरातील सर्व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याचे समूहगान यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान समोरील भव्य प्रांगणात झाले. कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

   

विभागीय केंद्र - कराड

 
मा. श्री. बाळासाहेब उर्फ श्यामराव पां. पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, कराड
 विरंगुळा, प्लॉट नं. १३ व १४,
 शिवाजी कों. ऑप. हौसिंग सोसायटी मर्या,
 कराड,
जिल्हा सातारा - ४१५ ११०
 कार्यालय : ०२१६४ - २२१०६०
 ईमेल : andbalasathebpatil@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft