३३ व्या पुण्यतिथी निमित्त भव्य पदयात्रा



कराड : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र कराड यांच्या संयुक्त विद्यमाने देशनेते यशवंतरावजी चव्हाण यांची ३३ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शनिवारी २५ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ४ वाजता कराड मध्ये भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. पदयात्रा मार्ग विरंगुळा-विजय चौक-टिळक हायस्कूल-कन्याशाळा-चावडी चौक-समाधी स्थळ असा असेल. त्यानंतर समाधी स्थळी पुष्पांजली व सन्माननियांची आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम होईल. भव्य पदयात्रे मध्ये अधिक लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटिल आणि मोहनराव कृष्णाजी डकरे यांनी केले आहे.

   

विभागीय केंद्र - कराड

 
मा. श्री. बाळासाहेब उर्फ श्यामराव पां. पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, कराड
 विरंगुळा, प्लॉट नं. १३ व १४,
 शिवाजी कों. ऑप. हौसिंग सोसायटी मर्या,
 कराड,
जिल्हा सातारा - ४१५ ११०
 कार्यालय : ०२१६४ - २२१०६०
 ईमेल : andbalasathebpatil@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft