यशवंतराव चव्हाण साहेब यांची १०७ वी जयंती सोहळा

WhatsApp Image 2020 03 12 at 10.34.41 AM 1

दिनांक १२ मार्च २०२० रोजी स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या १०७ व्या जयंती निमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र कराड यांच्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. सकाळी ८:३० वाजता सजवलेल्या बग्गीमध्ये स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांची प्रतिमा ठेऊन सौ. वेणूताई चव्हाण स्मारक येथून पदयात्रेस प्रारंभ झाला. ही पदयात्रा "विरंगुळा" येथील स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विजय दिवस चौक, दत्त चौक, आजाद चौक, चावडी चौक मार्गे १० वाजता "प्रीतिसंगम" या साहेबांच्या समाधीस्थळी पोहोचली. या पदयात्रेस यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र कराडचे सदस्य श्री नंदकुमार बटाणे, श्री अशोकराव गणपतराव चव्हाण, सचिव श्री मोहनराव डकरे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी व सौ. वेणूताई चव्हाण पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तसेच यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, सौ. वेणूताई चव्हाण कॉलेज, शिवाजी हायस्कूल व विठामाता हायस्कूल या संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होते. समाधीस्थळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आदरांजली व पुष्पांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यशवंतराव चव्हाण साहेब यांची ३५ वी पुण्यतिथी....

WhatsApp Image 2019 11 25 at 9.50.45 PM


आज दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ रोजी स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या ३५ व्या पुण्यतिथी निमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र कराड यांच्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. दुपारी ४ वाजता सजवलेल्या बग्गीमध्ये स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांची प्रतिमा ठेऊन सौ. वेणूताई चव्हाण स्मारक येथून पदयात्रेस प्रारंभ झाला. ही पदयात्रा "विरंगुळा" येथील स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विजय दिवस चौक, टिळक हायस्कूल, कन्या शाळा, चावडी चौक मार्गे ६ वाजता "प्रीतिसंगम" या साहेबांच्या समाधीस्थळी पोहोचली. या पदयात्रेस यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र कराडचे सचिव श्री मोहनराव डकरे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी व सौ. वेणूताई चव्हाण पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तसेच यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, सौ. वेणूताई चव्हाण कॉलेज, शिवाजी हायस्कूल व विठामाता हायस्कूल या संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होते. समाधीस्थळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आदरांजली व पुष्पांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

   

विभागीय केंद्र - कराड

 
मा. श्री. बाळासाहेब उर्फ श्यामराव पां. पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, कराड
 विरंगुळा, प्लॉट नं. १३ व १४,
 शिवाजी कों. ऑप. हौसिंग सोसायटी मर्या,
 कराड,
जिल्हा सातारा - ४१५ ११०
 कार्यालय : ०२१६४ - २२१०६०
 ईमेल : andbalasathebpatil@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft