दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा संपन्न...

242238918 4606724389359522 3797863713866955683 n

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच आणि पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या वतीने कृषी विकास प्रतिष्ठान, निसर्ग कार्यालय, पुणे येथे दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी देशभरातून दिव्यांग तरुण-तरुणी उपस्थित राहिले. या मेळाव्यात सहा विवाह निश्चित झाले. आगामी काळात असे मेळावे विभागवार आयोजित करण्यात येणार असून त्यांचे विवाह देखील लावून देण्यात येतील. या मेळाव्यात जमा झालेली तरुण-तरुणींची माहिती ऑनलाईन देखील देण्यात येणार आहे.

या सर्वांचे विवाह येत्या डिसेंबर महिन्यात आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवशी म्हणजेच १२ डिसेंबर रोजी बारामती येथे सामुदायिक विवाह सोहळ्यात संपन्न होणार आहेत. या सोहळ्यात प्रत्येक जोडप्याला विवाहासाठी आवश्यक असणारे साहित्य,वधू वरांचे कपडे देण्यात येणार आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यध्यक्षा खा. सौ. सुप्रियाताई सुळे, ज्येष्ठ समाजसेविका नसिमा हुर्जूक यांनीही या मेळाव्यास भेट देऊन सहभागी झालेल्या सर्व प्रतिनिधीना शुभेच्छा देत त्यांच्याशी संवाद साधला.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी समन्वयक म्हणून जिल्हा अपंग पुनवर्सन केंद्राचे नंदकुमार फुले, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विजय कान्हेकर, अशोक सोळंके, दीपिका शेरखाने, सुकेशिणी मर्चंडे, विष्णू वैरागकर, बाळासाहेब जगताप, अमेय अग्रवाल, सागर कान्हेकर, दिव्यांग कार्यकर्ते भाग्यश्री मोरे, मिनीता पाटील, दत्तात्रय भोसले, अभय पवार आदींनी काम पाहिले. या मेळाव्यात सहभागी झालेल्या कर्णबधिर प्रतिनिधींसाठी तेजस्विनी तळगूळकर यांनी दुभाषक म्हणून काम पाहिले, याबद्दल त्यांचे मनापासून आभार.

   

अपंग हक्क अभियान संपर्क  

श्री. विजय कान्हेकर, संयोजक
अपंग हक्क अभियान
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft