आठवे अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलन २२ व २३ फेब्रुवारीला...

WhatsApp Image 2020 02 18 at 4.58.06 PM

WhatsApp Image 2020 02 18 at 4.58.07 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, अपंग हक्क विभाग च्या सहकार्याने साहित्य व सांस्कृतिक मंडळ, पुणे तर्फे आठवे अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलन २०२० शनिवार दि. २२ व रविवार २३ फेब्रुवारी २०२० रोजी स्वामी विरजानंद साहित्य नगरी, बाल कल्याण संस्था, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
आठवे अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका डॉ. कुसुमलता मलिक यांची तर संमेलन उद्घाटक म्हणून ज्येष्ठ संस्कृत पंडित डॉ. दयाल सिंह पंवार यांची निवड करण्यात आली आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात परिसंवाद, कवीसंमेलन, कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रम, यशस्वी दिव्यांगांच्या यशोगाथा तसेच साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या स्मरणिकेचे व दिव्यांग साहित्यिकांच्या साहित्याचे प्रकाशन होणार आहे.
अधिक माहितीसाठी This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
९९६०१३२२०७ / ९५०३१९८९१९ वर संपर्क करावा.

   

अपंग हक्क अभियान संपर्क  

श्री. विजय कान्हेकर, संयोजक
अपंग हक्क अभियान
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft