शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई सर्व शिक्षणप्रेमींसाठी "देशोदेशीच्या शिक्षणपद्धती" या व्याख्यानमालेतील अकरावे पुष्प शनिवार, ६ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ५ ते ६.३० या कालावधीत ऑस्ट्रेलियाची शिक्षणपद्धतीचे अभ्यासक डॉ. विजय जोशी व भारती पार्डीकर हे "ऑस्ट्रेलियाची शिक्षणपद्धती" याविषयावर गुंफणार असून त्यांची मुलाखत शुभदा चौकर घेणार आहेत. झूम मीटिंग आणि फेसबुक लाईव्ह (ycp100) या दोनपैकी एका माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होता येईल. इच्छुक शिक्षक, पालक आणि शिक्षणप्रेमी यांनी डॉ. माधव सूर्यवंशी यांच्याकडे 9967546498 या क्रमांकावर आपली नाव, राहण्याचे ठिकाण, व्हाट्सअँप क्रमांक, व्यवसाय ही माहिती पाठवावी. झूमवर 100 एवढीच क्षमता असल्यामुळे सर्व इच्छुकांना तिथे सामावून घेता येणार नाही. ज्यांना झूमवर सामावून घेता येणार नाही त्यांनी फेसबुक लाईव्हवर हा कार्यक्रम पहावा, अशी नम्र विनंती आहे. ही सर्व व्याख्याने https://www.youtube.com/.../YashwantraoChavanPra.../featured या युट्युब चॅनेलवरही टाकण्यात येईल. त्यामुळे ज्यांना या विषयात रस आहे, ते आपल्या सवडीनुसार ही व्याख्याने ऐकू/पाहू शकतील.
- डॉ. वसंत काळपांडे, मुख्य संयोजक,शिक्षण विकास मंच,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
कायदेविषयक सहाय्य व मोफत सल्ला केंद्र, ५ मार्च २०२१ पासून पूर्वव्रत सुरू करण्यात येत आहे. कोरोना कालावधीतील परिस्थिती लक्षात घेता एका दिवशी फक्त दोन व्यक्तींना मार्गदर्शन केले जाईल. तसेच त्याअगोदर दूरध्वनीवर संपर्क करुन आपली तारीख व वेळ ठरविणे बंधनकारक आहे. तसेच विधी साक्षरता कार्यशाळा घेण्यात येत आहे.
वार - शुक्रवार वेळ - संध्याकाळी ५ ते ७
संपर्कसाठी : मनिषा खिल्लारे 22028598, ext २४४ ( सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत)
