यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक, क्रीडा व विशेष क्रिडा युवा पुरस्कार जाहीर..

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दरवर्षी प्रमाणे देण्यात येणा-या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक व क्रीडा पुरस्कार २०१६’ ची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे हे क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व रचनात्मक काम करणा-या युवक-युवतींना सामाजिक युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे यंदाचे अठरावे वर्ष आहे. वितरणाचा कार्यक्रम शनिवार दि. १४ जानेवारी २०१७ रोजी बारामती येथे नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या निमंत्रक खा. सुप्रिया सुळे, कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. सन २०१६ सालचा‘यशवंतराव चव्हाण विशेष युवा क्रीडा पुरस्कार’ महाराष्ट्राची प्रसिद्ध धावपटू ललिता बाबर (अॅथलेटीक्स) यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र असे आहे. या वर्षीचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार –युवक व युवती’ क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दत्तु भोकनल, नाशिक (नौकानयन) व अभिलाषा म्हात्रे, नवी मुंबई (कबड्डी) यांना तर सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल संतोष गर्जे, बीड (वंचित मुलांसाठी शिक्षणाचे भरीव कार्य) व हेमलता तिवारी, मुंबई (मुंबईतील लोकलमध्ये गाणे गाऊन उपजिविका मिळविणा-या २०० निराधार लोकांना योग्यव्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य) यांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार – युवक व युवती’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कारांचे स्वरूप असून प्रत्येकी २१ हजार रु. रोख, व सन्मानपत्र असे आहे.

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार – २०१७
साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम

मुंबई : दरवर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार दिले जातात. सामाजिक व क्रीडा विभागात एक युवक व एक युवती यांना विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार’ (युवक व युवती) व ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार’ (युवक व युवती) असे एकूण चार पुरस्कार दिले जातात. क्रीडा व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून इतर युवांसमोर एक आदर्श ठेवणाऱ्या युवा वर्गाच्या कर्तुत्वाची दाखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा यामागे उद्देश आहे. पुरस्काराचे यंदाचे अठरावे वर्ष आहे. पुरस्काराचे वितरण जानेवारी महिन्यात राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने बारामती येथे करण्यात येईल.
महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व भरीव कार्य करणाऱ्या युवक-युवतींची समाजाला ओळख व्हावी हे या सामाजिक युवा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. पुरस्कारासाठी व्यक्तीचे वय ३१ डिसेंबर २०१६ अखेरीस ३५ वर्षांच्या आत असले पाहिजे. पुरस्कारासंबंधीची संपूर्ण माहिती व फॉर्म डाऊनलोड करावे. आपले प्रस्ताव व अर्ज संपूर्ण माहितीनिशी दिलेल्या फॉर्मवर भरून दि. १५ डिसेंबर २०१६ च्या आत संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई – २१ या पत्त्यावर, अथवा This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या मेल आयडीवर पाठवावेत. या पुरस्कारासंबंधी अधिक माहितीकरिता कार्यालयामध्ये ०२२-२२०२८५०८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा श्री. सुबोध जाधव (९८२३०६७८७९) व श्रीमती मनीषा खिल्लारे (९०२२७१६९१३) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या कार्याध्यक्ष्या खा.सुप्रिया सुळे व कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ यांनी केले आहे.

 डाऊनलोड माहितीपत्रक व फॉर्म
     राज्सस्तरीय क्रीडा युवा पुरस्कार २०१७  
     राज्यस्तरीय सामाजिक युवा पुरस्कार २०१७
   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft