राज्यस्तरीय वक्तृत्व व नेतृत्व शिबीर संपन्न

खा.सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबईच्या वतीने शनिवार दिनांक २२ व रविवार २३ एप्रिल रोजी राष्ट्रीय मिल मजदूर संघ परळ, मुंबई येथे "राज्यस्तरीय युवा वक्तृत्व व नेतृत्व शिबीर" आयोजित करण्यात आले होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई चे अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांच्या कायदे मंडळातील कारकिर्दीला २२ फेब्रुवारी २०१७ रोजी पाच दशकांचा कालावधी पुर्ण झाला. या निमित्ताने ‘सुवर्णगाथा ५० ’ या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या . राज्यातील विद्यार्थी यात सहभागी झाले होते. त्यांच्यामधील गुणवत्ता कश्या पद्धतीने वाढवता येतील , विविध क्षेत्रातील कामकाज, नियम यांची त्यांना माहिती मिळावी या उद्देशाने शनिवार दि. २२ आणि रविवार दि. २३ एप्रिल रोजी अंतिम विजेत्या विध्यार्थ्यांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय युवा वक्तृत्व व नेतृत्व शिबीराचे मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास कोल्हापूर, सोलापूर, उसमानाबाद, पुणे, नगर, औरंगाबाद, हिंगोली, बारामती, नांदेड, परभणी, तसेच मुंबई यां ठिकाणांहून विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. या शिबिरात विद्यार्थ्यांसाठी नकाशावाचानाचे महत्व काय आहे हे अरविंद वैद्य यांनी विद्यार्थ्यांना सांगितले . ज्यामध्ये सामाजिक, भौगोलिक, राजकीय, सांस्कृतिक ह्या गोष्टींचा कसा समावेश आहे हे उत्तम पद्धतीने समजावून सांगितले.
कोणीही व्यक्ती मोठी जरी असली तरी त्यांस उत्तम संवाद हा खूप महत्वाचा भाग आहे, वक्तृत्व हे जीवनउपयोगी असे कौशल्य आहे. असे सांगत अजित जोशींनी वक्तृत्व संवाद कौशल्य व त्यातून करिअरची संधी कशी मिळेल या सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांसोबत मोकळेपणाने संवाद साधला.
महेश अचिंतलवार यांनी विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्वामध्ये नेहमी होणा-या उणीवा, तसेच त्या होऊ नयेत म्हणून त्यसाठी आवश्यक अशी माहिती दिली. आपल्या भाषणात कोणत्या प्रकारे कमी पण स्पष्ट आणि महत्वाचे मुद्दे असावेत व कश्याप्रकारे आपण मांडावेत याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले. कायदेमंडळ स्वरूप व कार्य या विषयावर आ. निरंजन डावखरे व मा. आमदार हेमंत टकले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तर प्रशासन व त्यांचे कामकाज या विषयावर विक्रम खलाटे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. महाराष्ट्रातील माध्यमांचा एकूण परिचय व त्याचा होणारा प्रभाव याबद्दल पद्मभूषण देशपांडे यांनी सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांचे शंका निरसन केले. तसेच सुनील तांबे यांनी माध्यमांसाठी वापरण्यात येणा-या तंत्रज्ञानाविषयी विद्यर्थ्यांना महती दिली. विद्यार्थ्यांना उपयुक्त असे विविध कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रमाचा समारोप प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ यांनी केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज चव्हाण यांनी सर्वांशी समन्वय साधला. व त्यांना संजय बोरगे, विजय कसबे, अदिती नलावडे, उमाकांत जगदाळे , रमेश मोरे, मनिषा खिल्लारे, महेश साळवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft