यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न...

53043079 2293754070656577 1448428976992157696 o


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने मागील एकवीस वर्षांपासून सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या युवक युवतींना राज्यस्तरीय युवा पुरस्कार दिले जातात. यंदाच्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार-२०१९ ची घोषणा करण्यात आलेली होती. या पुरस्कारांचा वितरण सोहळा रविवार, दि. ३ मार्च २०१९ रोजी, सायं ५ वा., लोकनेते ना. शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन, धनकवडी, पुणे येथे पार पडला. प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा मा. खा. सौ. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते क्रीडा व सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या वेदांगी कुलकर्णी (सायकल पटू ), किसन नरशी तडवी (धावपटू), साक्षी दिनेश चितलांगे (बुद्धीबळ पटू), अभिजित सदानंद दिघावकर व स्नेहल चौधरी कदम यांना (युवा सामाजिक पुरस्कार ) या युवांना सन्मानित करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार
वितरण सोहळ्याचे दि. ३ मार्च रोजी पुणे येथे आयोजन..

प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा मा. खा. सौ. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार वितरण..

IMG 20190227 WA0007


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने मागील एकवीस वर्षांपासून सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या युवक युवतींना राज्यस्तरीय युवा पुरस्कार दिले जातात. यंदाच्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार-२०१९ ची घोषणा करण्यात आलेली होती. यामध्ये राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार व राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारांचा वितरण सोहळा रविवार, दि. ३ मार्च २०१९ रोजी, सायं ५ वा., लोकनेते ना. शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन, धनकवडी, पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या पुरस्कारांचे वितरण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा मा. खा. सौ. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी पुणे विभागीय केंद्राचे अध्यक्ष अजित निंबाळकर, सचिव अंकुश काकडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. क्रीडा पुरस्कारातून वेदांगी कुलकर्णी, साक्षी चितलांगे, किशन तडवी तर सामाजिक पुरस्कारातून स्नेहल चौधरी व अभिजीत दिघावकर यंदाचे मानकरी ठरले आहेत.

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft