पूरग्रस्तांसाठी मदतकार्य
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई च्या वतीने सातारा, सांगली,कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आदरणीय सुप्रियताईंच्या मार्गदर्शनानुसार मुंबईकरांना केलेल्या आव्हानाला मुंबईकरांनी उत्तम प्रतिसाद दिला व एका दिवसात प्रचंड मदत चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आणून दिली. यासाठी प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ, श्री विद्याधर खांडे,मुंबई विभागीय संघटक उमाकांत जगदाळे, रमेश मोरे, महेश साळवी,मनीषा खिलारे, मीनल सावंत, सचिन बासुतकर,मुळे,अजय, महादेव, सुरेश सावंत, सिडॅकच्या प्रज्ञा, सेंट्रल कॅटर्सचे सुधाकर शेट्टी, प्रेम मिश्रा, नवी मुबंईच्या त्रिमुर्ती सोसायटी मधील रेडेकर, लग्नसराईचे राजू आंबेकर तसेच प्रतिष्ठानच्या कार्यालयातील सर्व पदाधिकारी, कर्मचारी सुरक्षा रक्षक यांनी भरभरून मदत आणि सहकार्य केले.
सर्वांचे मनपुर्वक आभार.
सदर मदतकार्य अजून सुरू असून आपण यामध्ये सहभागी होऊन सहकार्य करू शकता.
धन्यवाद.

WhatsApp Image 2019 08 11 at 7.42.37 PM

 यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा २०१९

Master Poster
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियान तर्फे यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. ही वक्तृत्व स्पर्धा औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, चिपळूण, नांदेड, अमरावती, नागपूर या ९ विभागीय केंद्रात घेण्यात येणार असून अंतिम फेरी १८ सप्टेंबर २०१९ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे होणार आहे. स्पर्धेसाठी ५ विषय देण्यात आले आहेत.  विभागीय केंद्रातून प्रथम येणा-यास रू. ५०००, द्वितीय रू.३०००, तृतीय २००० व उत्तेजनार्थ(दोन) रू. १००० , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तसेच अंतिम फेरीत प्रथम पारितोषिक रू. १५,०००, द्वितीय रू.१०,०००, तृतीय ७००० व उत्तेजनार्थ(दोन) रू. ३००० आणि स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरुप असणार आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांना ycpmumbai.com या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला रजिस्ट्रेशन फॉर्म भरून स्पर्धेत सहभागी होता येईल. 

डाऊनलोड माहितीपत्रक व फॉर्म
सर्व विभागासाठी माहितीपत्रक
  औरंगाबाद  माहितीपत्रक  कॉलेज पत्र  रजिस्ट्रेशन फॉर्म
  नाशिक  माहितीपत्रक  कॉलेज पत्र  रजिस्ट्रेशन फॉर्म
  मुंबई  माहितीपत्रक  कॉलेज पत्र  रजिस्ट्रेशन फॉर्म
  पुणे  माहितीपत्रक  कॉलेज पत्र  रजिस्ट्रेशन फॉर्म
  कोल्हापूर  माहितीपत्रक  कॉलेज पत्र  रजिस्ट्रेशन फॉर्म
  चिपळूण  माहितीपत्रक  कॉलेज पत्र  रजिस्ट्रेशन फॉर्म
  नांदेड  माहितीपत्रक  कॉलेज पत्र  रजिस्ट्रेशन फॉर्म
  अमरावती  माहितीपत्रक  कॉलेज पत्र  रजिस्ट्रेशन फॉर्म
  नागपूर  माहितीपत्रक  कॉलेज पत्र  रजिस्ट्रेशन फॉर्म
   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft