एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता विषयावर राज्यस्तरीय बैठक

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विकास अध्ययन केंद्र, कोरो मुंबई आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता या विषयावर मंगळवारी १३ मार्च २०१८ रोजी सकाळी ९.३० ते ५ पर्यंत चव्हाण सेंटर मध्ये राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण असावे, यासाठी आयोजीत राज्यस्तरीय चर्चासत्रामध्ये आतापर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या सहभागाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! या कामाला पुढे घेऊन मंगळवारी १३ मार्च २०१८ रोजी एकदिवसीय राज्यस्तरीय व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आपण सहभागी होऊन एकल महिलांसाठी स्वतंत्र्य धोरणाची आवश्यकता या विषयावरील आपले विचार, मतं, संशोधनात्मक लेख व सूचना मांडाव्यात. एकदिवसीय विचार मंथनाच्या प्रक्रियेतून समोर आलेल्या मुद्द्यांवर आपण एकत्र मिळून एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाचा तयार झालेला प्राथमिक मसुदा शासनाला सादर करता येईल, असे आम्हास वाटते. सोबत विषयाची सुची जोडली आहे.

तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि विकास अध्ययन केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. ही चर्चा प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात शनिवारी १० फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ५.०० या वेळेत होईल.

विशेष म्हणजे या परिसंवादात प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा मा. सुप्रिया सुळे यांच्यासह विषयांवर काम करणारे अभ्यासक, तसेच शासकीय प्रतिनिधी इत्यादी मान्यवर परिसंवादाला उपस्थित राहणार आहेत.

१३ नोव्हेंबर २०१७ रोजी ‘एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. ह्या परिसंवादामध्ये तृतीयपंथी महिला आणि त्यांच्या समस्या याविषयी चर्चा करण्यात आली होती. या सर्व चर्चेमधून एक समान सूर समोर आला तो म्हणजे तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र धोरणाची आखणी करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर सदर विषयावरील एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश असून नोंदणी आवश्यक आहे. संपर्क- मनिषा खिल्लारे ७०२०२९९६७७

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft