यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न...

53043079 2293754070656577 1448428976992157696 o


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने मागील एकवीस वर्षांपासून सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या युवक युवतींना राज्यस्तरीय युवा पुरस्कार दिले जातात. यंदाच्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार-२०१९ ची घोषणा करण्यात आलेली होती. या पुरस्कारांचा वितरण सोहळा रविवार, दि. ३ मार्च २०१९ रोजी, सायं ५ वा., लोकनेते ना. शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन, धनकवडी, पुणे येथे पार पडला. प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा मा. खा. सौ. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते क्रीडा व सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या वेदांगी कुलकर्णी (सायकल पटू ), किसन नरशी तडवी (धावपटू), साक्षी दिनेश चितलांगे (बुद्धीबळ पटू), अभिजित सदानंद दिघावकर व स्नेहल चौधरी कदम यांना (युवा सामाजिक पुरस्कार ) या युवांना सन्मानित करण्यात आले.

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft