यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा २०१७-१८ चे पुरस्कार जाहिर
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम.

newspaper award
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा २०१७-१८' ची विजयी महाविद्यालयांची नावे घोषीत करण्यात आली आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांच्या विचारांचे आणि भावनांचे प्रतिबिंब असंख्य महाविद्यालयीन नियतकालीकांमध्ये पडलेले पहावयास मिळते या नियतकालीकांमध्ये आपले लेख, कविता लिहणार्‍या विद्यार्थ्यांमधूनच उद्याचे साहित्यीक घडत असतात. युवांना आपले मत मांडायची संधी देतानाच त्यांच्यातील कलागुणांना वाव देणार्‍या नियतकालीकांचे महत्व लक्षात घेऊन राज्यातील उत्कृष्ट नियतकालीकांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे.


यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणा, जि. कोल्हापूर च्या ‘वारणा’ या नियतकालीकाने प्रथम क्रमांक पटकाविला असून रु. १०,०००/- चा धनादेश, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. द्वितीय क्रमांक के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग आणि इन्फॉरर्मेशन टेक्नोलॉजी या महाविद्यालयाच्या ‘ऑरा २०१७'या नियतकालीकास मिळाला आहे. रु. ७,०००/- चा धनादेश, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तृतिय क्रमांक कमला नेहरू आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय नागपूर च्या ‘स्त्रियांची आत्मचरित्रे २०१७’ या नियतकालीकास मिळाला असून रु. ५,०००/- चा धनादेश, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ यांच्या ‘तरंग’ व कत्रुवार कला, रतनलाल काबरा विज्ञान आणि बी. आर. मंत्री वाणिज्य महाविद्यालय, परभणी यांच्या ‘मानवता’ या दोन नियतकालीकास उत्तेजनार्थ पारितोषीके जाहिर झाली आहे. रु. ३,०००/- चा धनादेश, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रत्येकी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

निवड झालेल्या सर्व पुरस्कारार्थी महाविद्यालयांचे प्रतिष्ठानच्या कार्यकारी समितीने अभिनंदन केले असून सदर पुरस्कार त्या-त्या महाविद्यालयात जाऊन समारंभ पूर्वक वितरीत केल्या जातील,असे नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft