एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता (राज्यस्तरीय चर्चासत्र)मराठवाड्यात २०१५ व २०१६ या दोन वर्षांमध्ये पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 'एकल महिला व पाणिप्रश्न' या विषयावर संशोधन अहवाल प्रसिध्द करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने औरंगाबाद येथे ९ सप्टेंबर २०१७ रोजी 'एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता' या विषयावर विभागीय चर्चासत्र आयोजीत केले होते. या कार्यक्रमात झालेल्या सर्व चर्चेतून एक समान सूर समोर आला तो म्हणजे एकल महिलांसाठी 'स्वतंत्र धोरणाची आखणी' करणे गरजेचे आहे.या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विकास अध्ययन केंद्र, मुंबई, कोरो-मुंबई, कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट, मुंबई या सर्व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण केंद्र, जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१ येथे राज्यस्तरीय चर्चासत्र सोमवारी १३ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत आयोजीत करण्यात आले आहे. समाजातील सर्व घटकांमधील महिलांच्या प्रश्नांवर कार्य करणा-या व्यक्ती व संस्थांना या चर्चासत्राकरिता आमंत्रित करीत आहोत.

या चर्चासत्रासाठी आपला सहभाग महत्त्वपुर्ण आहे. आपण ह्या सगळ्या प्रक्रियेत सहभागी झालात तर एकत्र मिळून एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाचा प्राथमिक मसुदा शासनाला २०१८ साली जागतिक महिला दिनी सादर करता येईल, असे आम्हांस वाटते. यासाठीचे चर्चासत्र आणि पुढील धोरणाची मांडणी करण्यासाठी आपली संस्थाही या प्रक्रियेत सोबत जोडली जावी असे आम्हाला वाटते, तरी आपल्या संस्थेतील दोन प्रतिनिधिंना या चर्चासत्रात सहभाग नोंदविण्याकरिता पाठवावे, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

विशेष सुचना : चर्चासत्रातील सहभाग निशुल्क असून उपस्थित प्रतिनिधींच्या चहा नास्ता व भोजनाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आलेली आहे. चर्चासत्राकरीताची नोंदणी अनिवार्य असून शनिवार, दि. ११ नोव्हेंबर २०१७ रोजी पर्यंत नोंदणी करण्यात यावी. नोंदणी करीता संपर्क - मनिषा खिल्लारे (७०२०२९९६७७)

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft