लघुपट निर्मिती कार्यशाळा...!!!यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई नवमहाराष्ट्र युवा अभियान व प्रयोग मालाड यांच्या संयुक्त विद्यमाने फिल्मिन्गो आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या निमित्ताने राज्यात नऊ ठिकाणी लघुपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यापैकी दुसरी कार्यशाळा आज दिनांक २६ सप्टेंबर २०१७ रोजी यशस्विनी भवन, बेलवली, बदलापूर ( पश्चिम ) येथे यशस्वीरित्या पार पडली. प्रयोग मालाड संस्थेचे प्रदीप देवरुखकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसिद्ध समीक्षक , लेखक-दिग्दर्शक अशोक राणे, महेंद्र तेरेदेसाई यांनी उपस्थितांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत उस्तुक युवक व युवती असे ९४ सहभागी उपस्थित होते.

या कार्यशाळेत ‘लघुपट’ म्हणजे नेमकं काय, लघुपट निर्मितीची इतर अंगे या प्रमुख विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच लघुपट म्हणजे पूर्ण लांबीच्या चित्रपटाचे लघुरूप नव्हे हे स्पष्ट केले तसेच देशविदेशातील लघुपट दाखवून व व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन करण्यात . भारतात जागतिक दर्जाचे लघुपट निर्माण व्हावेत. आणि लघुपटा विषयी लोकांपर्यंत माहिती पोहोचावी. हा या कार्यशाळेचा प्रमुख हेतू होता. - कॅप्टन आशिष दामले

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft