प्रकाशाच्या प्रदुष्णाचा परिणाम प्राण्यावर होत असतो.. प्रा. विनय आर.आर

83380029 1321088801432762 3819661673581510656 n


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषदेच्या संयुक्त विद्यमाने महिन्यातून एकदा विज्ञानाच्या विषयावर माहिती देण्यासाठी 'विज्ञानगंगा' कार्यक्रमाचे आयोजन होत असते. विज्ञानगंगाच्या सेहेचाळीसाव्या पुष्पामध्ये ‘प्रकाश आणि अंधार' ('Light and Darkness) या विषयावर प्रा विनय आर. आर. ह्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत एक वेगळ्यापद्धतीने हे व्याख्यान सादर केले..व्याख्यानात प्रकाश व अंधार यामध्ये जीवसृष्टी व प्राण्यावर काय परिणाम होतो ह्यांची सखोल माहिती त्यांनी दिली. एक उदाहरण दाखल पाण कासव हे जेव्हा सूर्याचे दक्षिण व उत्तर दिशेने होणारे संक्रमण काळामध्ये अंधार जास्त होतो त्यावेळी ही पाण कासव आपली अंडी घालतात. परंतु आता समुद्र किना-यावर ठिक ठिकाणी प्रकाश असल्यामुळे त्यांच्या प्रजन्नावर परिणाम झाला आहे असे त्यांनी सांगितले. असे अनेक मुद्दावर विद्यार्थांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नोत्तराला उत्तर देत मार्गदर्शन केले. व्याख्यानानंतर पुढील विज्ञानगंगा व्याख्यान दिनांक २१ फेब्रुवारी २०२० रोजी 'महाराष्ट्राचा दुष्काळ' या विषयावर डॉ. अतुल देऊळगावकर व्याख्यान देणार आहे असे जाहिर केले

विज्ञानगंगाचे सेहेचाळीसावे पुष्प 'प्रकाश आणि अंधार'

VIDNYAN GANGA 24012020

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ कार्यक्रमांतर्गत ‘प्रकाश आणि अंधार' ('Light and Darkness) या विषयावर विनामूल्य मराठीतून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी विज्ञान परिषद आणि पुणे विभागाचे माजी अध्यक्ष प्रा. विनय आर. आर हे शुक्रवार दि. २४ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती प्रतिष्ठान तर्फे करण्यात आली आहे.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft