हवामान बदलाचा धोका भारताला जगात पाचवा अतुल देऊळगावकर

WhatsApp Image 2020 02 18 at 8.31.55 PM 2

आजपर्यंत आपण अनेक दुष्काळ पाहिले. याच वर्षी महाराष्ट्राच्या अनेक भागात आलेल्या पुरामुळे आपल्याला ओला दुष्काळ परिचित झाला. हाच विषय धरून आपण हे रोखण्यासाठी काय करू शकतो यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा कार्यक्रमाअंतर्गत अतुल देऊळगावकर यांचे महाराष्ट्रातील दुष्काळ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
दुष्काळ म्हणजे काय? यंदा महाराष्ट्राने दोन्ही दुष्काळ अनुभवले आहेत. दुष्काळाचे दुष्परिणाम काय? दुष्काळाचा शेती, जमीन, पाणी आणिु मानवतेवर काय परिणाम होतो, कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते याची माहिती अतुल देऊळगावकर यांनी आपल्या व्याख्यानातून दिली.
ते पुढे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे पुराचा धोका निर्माण होतो. सध्या चालू असलेली बेसुमार वृक्षतोड, पाण्याचा अपव्यय, मानवी चुकांमुळे हवामान बदलात वाढ झालेली आहे. आणि याचाच परिणाम म्हणून आपल्यासमोर ओला आणि सुका दुष्काळासारखी संकट समोर येऊन ठेपलेली आहेत.
परदेशात काटेकोर शेती, रोबोट वापरून, विना माती शेती अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली जाते आहे. भारतात अजूनही अशा तंत्रज्ञानाचा विकास झालेला नाही. अशा तंत्रज्ञानाचा वापर करून आपण भर पावसात सुद्धा टिकेल, अशी शेती करू शकतो. अशा तंत्रज्ञानाची खरी गरज आहे, यामुळे शेतीमुळे होणाऱ्या आत्महत्या होणार नाहीत. महाराष्ट्रात १९९५ पासून शेतकरी विधवांची संख्या ७५,००० आहे. आपण वापरत असलेल्या गोष्टींमध्ये कार्बन आणि वॉटर फुटप्रिंट किती आहेत, त्या आपण कशा कमी करू शकतो, याबाबत आपण विचार केला पाहिजे. अहमदनगर भोजापुरी येथे १९९८ ते २००० सालामध्ये सलग समतोल चराचा वापर करून अवघ्या २०० मिलिमिटर पावसात लाखो झाडे लावली गेली. अशा उपाययोजनेचा वापर करून आपण पाणी साठवणीत वाढ करू शकतो, असेही ते म्हणाले.

विज्ञानगंगाचे सत्तेचाळीसावे पुष्प महाराष्ट्रातील दुष्काळ'

WhatsApp Image 2020 02 07 at 4.42.17 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा’ कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील दुष्काळ' (Famine in Maharashtra) या विषयावर विनामूल्य मराठीतून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. लातूरचे पत्रकार, श्री. अतुल देऊळगावकर मंगळवार दि. १८ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft