विशेष सूचना

मा. सरचिटणीसांच्या आदेशानुसार,

  • दिनांक १९ मार्च, २०२० रोजीचा महिला गौरव पुरस्कार कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
  • दिनांक २० मार्च, २०२० रोजीचा विज्ञानगंगा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
  • रंगस्वरमधील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत.
  • मुख्य सभागृहातील व रंगस्वरमधील यापूर्वी राखीव केलेले कार्यक्रम / बैठक पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
  • माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांसाठी वर्ग २५ मार्च, २०२० व ग्रंथालयातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय ३१ मार्च, २०२० पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.

 

मा. शरद काळे यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सत्कार सोहळा...

WhatsApp Image 2020 02 24 at 9.34.40 AM

सहस्त्रचंद्रदर्शन म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात १००० वेळा पूर्ण चंद्र पाहिला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांचा हा विशेष सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा रंगस्वर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे संपन्न झाला.
शरद काळे यांचे बालपण आणि शालेय शिक्षण पुणे येथे झाले. १९६२ साली पुणे येथे MA गणित विषयात सुवर्ण पदक मिळवून १९६३ साली प्रशासकीय सेवेत दाखल झाले. १९७२ साली हवाई विद्यापिठातून एमबीए ची पदवी प्राप्त केली. शरद काळे हे १९६३ च्या महाराष्ट्र तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. कोल्हापूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गोवा मुख्यमंत्र्यांचे सचिव, उद्योग व नियोजन विभागाचे सचिव १९९१ १९९५ मुंबई महानगरपालिका आयुक्त, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम सांभाळले आहे. प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर रिझर्व बँक, स्टाफ सिलेक्शन बोर्ड अशा राज्य सरकार आणि भारत सरकारच्या वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण संस्थांच्या समित्यांवरही त्यांनी काम पाहिलेले आहे.
शरद काळे हे १९६३ साली प्रशासकीय सेवेत रुजू झाले. शरद काळे यांनी १९९८ पासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कामकाजाची धुरा सांभाळली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान वेगवेगळे उपक्रम पार पाडत आहे.
या सोहळ्याच्या सुरूवातीला अंबरिश मिश्र यांनी साहिर लुधियानवी यांच्या गायनावरचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी केले. त्यानंतर शरद पवार यांच्या हस्ते शरद काळे यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या मानपत्राचे वाचन दत्ता बाळसराफ यांनी केले. शरद काळे जवळून परिचित असलेले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, त्यांच्या कन्या सुचित्रा दळवी, ज्येष्ठ शल्यचिकित्सक व लेखक रविन थत्ते यांनी त्यांच्या विषयी अनेक गोष्टींचा उलगडा केला.
शेवटी शरद काळे यांनी आपल्या कारकिर्दीतील, आयुष्यातील अनुभव सांगत मनोगत व्यक्त केले.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft