हवामान बदलाचे संकट रोखूया चर्चासत्र

IMG 20190715 WA0009

जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाचे संकट समस्त मानवजात आणि पृथ्वीतलावरील सृष्टीला ग्रासून टाकत आहे. स्वाभाविकपणे भारत आणि महाराष्ट्रही यातून सुटलेला नाही.
आपण सर्व जण आपापल्या क्षमतेनुसार पर्यावरण संरक्षणाच्या कामात सक्रीय आहोत.
जागतिक तापमानवाढ दीड अंश सेल्सिअसच्या खाली आणणे हे जागतिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनव्यवस्थेपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच कटिबद्ध व्हायचं आहे. यासाठी आवश्यक लोकशिक्षण आणि कृती आराखडा राबविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन चर्चा – विनिमय करावा अशी कळकळीची विनंती आहे.
यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने बुधवार दिनांक १७ जुलै, २०१९ रोजी सकाळी १०.३० ते सायं ५.३० यावेळेत वरील विषयांवर बैठक व चर्चासत्राचे आयोजन केले आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
पूर्व नोंदणी आवश्यक...
संपर्क :- संगीता खरात –९९३०४०१३२९

विज्ञानगंगाचे चाळीसावे पुष्प ‘भारतीय गणिती परंपरा’...

VIDNYAN GANGA 1972019
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’कार्यक्रमांतर्गत ‘भारतीय गणिती परंपरा’ या विषयावर विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे निवृत्त प्राध्यापक डॉ. सुधाकर आगरकर शुक्रवार दि. १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट मुंबई येथे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft