विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध याविषयावरती मार्गदर्शनयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे आपले आरोग्य आपल्या हाती असावे याच हेतूने विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध या विषयावरती संशोधक व सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षीत यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम विनामुल्य असून नागरिकांनी सहकुटूंब उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मा. सुप्रिया सुळे यांनी केले आहे. हा कार्यक्रम गुरूवारी १० जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता आर. एम. डी. कॉलेज, वारजे पुणे येथे सुरू होईल.

महिला गौरव पुरस्कार - २०१९ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 डाऊनलोड : नियमावली

मा. यशवंतरावजी चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून मानले जातात. राजकीय, सामाजिक, अर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या लक्षणीय कामगिरीमुळे राष्ट्रीय जीवनात महाराष्ट्राला गौरवास्पद स्थान प्राप्त झाले आहे. प्रखर स्वातंत्र्यसेनानी, कुशल मुत्सद्दी, संस्कृत सत्ताधीश, लोकाग्रणी म्हणून त्यांचे स्थान लोकमानसात चिरंतन राहणार आहे. त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जतन करून सार्वजनिक हिताचे विविध उपक्रम हाती घेण्याच्या उद्देशाने १९८५ साली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईची स्थापना करण्यात झाली.

प्रतिष्ठानतर्फे यावर्षी पासून 'महिला गौरव पुरस्कार' देण्यात येणार आहे. हा पुरस्कार महाराष्ट्रातील महिलेस देण्यात येणार आहे. सन २०१९ या वर्षासाठी समाजसेवा क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये भरीव कामगिरी करणा-या महिलेस महिला गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. रोख रक्कम १०,००० शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सदर पुरस्कारासाठी महिलांची नावे विहित पध्दतीनूसार सुचविण्यासाठी पुरस्कार नियमावली कृपया यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट मुंबई ४०० १२१ या पत्तावर संपर्क साधावा. पुरस्कारासाठी नावे पाठविण्याची अखेरची तारिख ३१ जानेवारी २०१९ आहे.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft