'पृथ्वीचे वाढते तापमान आणि आपण' व्याख्यान संपन्न

WhatsApp Image 2019 10 03 at 8.51.44 PM 1

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई तर्फे 'पृथ्वीचे वाढते तापमान आणि आपण' या विषयावर विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हवामानात होत चाललेला बदल, झाडांची होणारी कत्तल, बांधकामे, एकूणच या सर्व –हासाला कारणीभूत ठरणा-या मानवी कृती आटोक्यात आणता याव्यात याविषयी व्याख्याते अतुल देऊळगावकर यांनी भावी पिढीला हवामान बदलाविषयी जागृकता निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन केले. या गोष्टीचा गंभीर विचार करायचा असेल तर याविषयीच गांभीर्य येणा-या पिढीला कळायला पाहिजे अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

'पृथ्वीचे वाढते तापमान आणि आपण' याविषयावर व्याख्यान...

YBCHAVAN BANNER 3OCT2019 layout2

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान
, मुंबई तर्फे'पृथ्वीचे वाढते तापमान आणि आपण' या विषयावर विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्याते अतुल देऊळगावकर गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft