विज्ञानगंगाचे सोळावे पुष्प.. 'आधुनिक भारताची विज्ञान क्षेत्रातील प्रगती'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत सोळावे पुष्प, इस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. सुधीर पानसे यांचे 'आधुनिक भारताची विज्ञान क्षेत्रातील प्रगती' या विषयावर शुक्रवारी दिनांक १६ जून २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. वरील कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

भीष्मराज बाम यांच्या आठवणींना उजाळा...

ज्येष्ठ क्रीडा मानसतज्ज्ञ आणि निवृत्त विशेष पोलिस महानिरिक्षक भीष्मराज पुरुषोत्तम बाम यांची स्मृतीसभा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई तर्फे आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार, सरचिटणीस शरद काळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, क्रिडा पत्रकार विजय साळवी, संचालक नेहरु सेंटर सतिश सहानी आणि नेमबाज अंजली भागवत व सुमा शिरुर यांनी बाम यांच्या आठवणीना उजाळा दिला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी केले. त्यानंतर नेमबाज सुमा शिरूर यांनी आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळेच असे सांगून बोलायला सुरुवात केली. आतापर्यंत जितकी पदक मिळाळी ती फक्त बाम सरामुळेच शक्य होऊ शकले असेही तीने सांगितले. खेळातल्या सर्व समस्यांचा इलाज म्हणजे बाम सर तसेच संपूर्ण खेळाविषयी अधिक माहिती असलेली व्यक्ति म्हणजे बाम सर असे क्रीडा पत्रकार विजय साळवी यांनी सांगितले. आतापर्यंत जे काही मिळवले ते बाम सरांमुळेच आणि त्यांनी मला चांगली खेळाडू नाही तर चांगला माणूस म्हणून घडवले असे मत अंजली भागवत यांनी स्पष्ट केले. भारतातील बहुतांश खेळाडूंना मानसिक आधार जर कोणी दिला असेल तर बाम यांनी असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. तसेच सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांना सुध्दा बाम यांनी अनेकदा मार्गदर्शन केले आहे.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft