मानाचा मुजरा अमृतयोगकार्यक्रमात
छोटे शूर वीरांचे दमदार सादरीकरण...

 लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर होणार प्रसारण..

IMG 20190308 WA0002
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि कलर्स मराठी वाहिनी तर्फे पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मानाचा मुजरा अमृतयोग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद माडगूळकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कलर्स मराठी वाहिनीचे अनेक कलाकार उपस्थित होते. कलर्स मराठी वाहिनी वरील सूर नवा ध्यास नवा छोटे शूर वीर कार्यक्रमातील शरयू दाते, अंशिका चोनकर, स्वराली जाधव तर प्रियांका बर्वे यांनी पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके यांनी लिहिलेल्या साहित्याचे सादरीकरण केले. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता सुमीत राघवन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अतुल परचुरे, आनंद इंगळे, हेमांगी कवी, राहुल देशपांडे, ऋषिकेश रानडे, सोनिया परचुरे आणि ग्रुप आदी उपस्थित कलाकरांनी निरनिराळ्या कलाकृती सादर केल्या. ग. दि. माडगूळकर यांचे सुपुत्र शरद माडगूळकर, सुधीर फडके यांचे चिरंजीव श्रीधर फडके, कलर्स मराठी वाहिनीचे दिपक राजाध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्री शरद पवार, कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, हेमंत टकले, सरचिटणीस श्री. शरद काळे व अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft