पु.ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके
जन्मशताब्दी वर्षानिमित्त "मानाचा मुजरा"- अमृतयोग..

pula gadi bapbuji 2

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे पु.ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त "मानाचा मुजरा"- अमृतयोग हा कार्यक्रम गुरुवार दिनांक ७ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता, मुख्य सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष. मा. श्री. शरदराव पवार, अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक कलर्स मराठी, वाहिनी आहे. कार्यक्रमामध्ये सुमित राघवन, स्पृहा जोशी, अतुल परचुरे, आनंद इंगळे, हेमांगी कवी, राहुल देशपांडे, ऋषिकेश रानडे, अजित परब, प्रियांका बर्वे, शरयू दाते तसेच सुर नवा ध्यास नवा मधील छोटे सुरवीर सोनिया परचुरे व नृत्य समूह असे कलाकार असणार आहेत. अशा रंगतदार कार्यक्रमास आपण अगत्यपूर्वक उपस्थित राहावे असे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई तर्फे आवाहन करण्यात आले आहे

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft