विज्ञानगंगाचे चाळीसावे पुष्प भारतीय गणिती परंपरासंपन्न..

WhatsApp Image 2019 07 19 at 9.27.25 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगाकार्यक्रमांतर्गत चाळीसावे भारतीय गणिती परंपराव्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्याते होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे निवृत्त प्राध्यापक डॉ. सुधाकर आगरकर यांनी गणिताचा पाया भारतात कसा रोवला गेला, प्राचीन गणित काय होते, त्याचा कसा उपयोग केला जात असे, अशा वेगवेगळ्या विषयावर उदाहरण देऊन सांगितले. गणितात उपलब्ध असलेल्या पुस्तकांविषयही त्यांनी यावेळी माहिती दिली. भारताचा गणितामध्ये उल्लेखनीय वाटा आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. तसेच प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी मार्गदर्शन केले.

हवामान बदलाचे संकट रोखूया...!

WhatsApp Image 2019 07 17 at 5.23.22 PM

जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाचे संकट समस्त मानवजात आणि पृथ्वीतलावरील सृष्टीला ग्रासून टाकत आहे. स्वाभाविकपणे भारत आणि महाराष्ट्रही यातून सुटलेला नाही.आपण सर्वजण आपापल्या क्षमतेनुसार पर्यावरण संरक्षणाच्या कामात सक्रीय आहोत. जागतिक तापमानवाढ दीड अंश सेल्सिअसच्या खाली आणणे हे जागतिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनव्यवस्थेपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच कटिबद्ध व्हायचं आहे.
यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने बुधवार दिनांक १७जुलै, २०१९ रोजी सकाळी १०.३० ते सायं ५.३० यावेळेत वरील विषयांवर बैठक व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पर्यावरणाच्या क्षेत्रातील विविध मान्यवर सहभागी झाले होते. प्रथमतः प्रतिष्ठानचे कार्यक्रम व्यवस्थापक श्री. दत्ता बाळसराफ यांनी उपस्थितांचे स्वागत केले व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे सरचिटणीस मा. श्री. शरद काळे यांनी प्रास्ताविक केले. टेरी संस्थेच्या डॉ. अंजली पारसनीस,यांनी हवामान बदल या विषयवार सादरीकरण केले. महाराष्ट्राचा हवमान बदल विषयक आराखडा तयार करताना टेरी संस्थेने केलेले महाराष्ट्रातील विविध भौगोलिक पट्ट्यातील स्थानांचा आणि तेथील हवामानाचा अभ्यास करताना आलेले अनुभव तसेच तयार केलेला अभ्यास डॉ. अंजली पारसनीस यांनी मांडला. त्याच बरोबर पुढील ५० वर्षांत महाराष्ट्राचे हवामान विषयक चित्र कसे असेल याचे भविष्यचित्रही दाखवले. या परिणामकारक सादरीकरणामुळे उपस्थितांना हवामानबदल समस्येचे गांभीर्य तसेच त्यावर करावयाच्या तातडीच्या उपाययोजानांची गरज लक्षात आली. बर्ड लाईफ इंटरनॅशनलच्या आशियाई विभागाचे प्रमुख श्री. प्रशांत महाजन यांनी हवामान बदल आणि जैवाविविधता यावर भर देत हवामान बदलाचा पक्षांवर होत असलेल्या परिणामांवर सादरीकरण केले. तर पार्थ बापट यांनी निश्चित ध्येय धोरणे घेऊन योग्य दिशेने कृतीशील उपक्रमांद्वारे या समस्येला उत्तर शोधले पाहिजे असे प्रतिपादन केले. यानंतर स्त्री मुक्ती संघटनेच्या श्रीम. ज्योती म्हापसेकर यांनी महाराष्ट्र निसर्ग उद्याचे श्री. अविनाश कुबल, श्रीम. रश्मी जोशी, श्री. भगवान केसभट,श्री. फिरोज मसानी, श्री. सुनील तांबे, प्रतिष्ठानचे कार्यक्रम व्यवस्थापक श्री. दत्ता बाळसराफ, श्री. प्रशांत शिंदे यांनी चर्चेमध्ये सहभागी होऊन कृती आराखडा तयर करण्याच्या दृष्टीने विविध मुद्दे सुचवले. त्यानुसार महाराष्ट्राचे ५० शाळा आणि ५० महाविद्यालये हा क्र्रुती आराखडा राबविण्यासाठी निवडले जातील. ही बैठक यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने श्रीम. मनिषा खिल्लारे,श्रीम. मीनल सावंत, श्री. उमाकांत जगदाळे,श्री. महेश साळवी यांनी विशेष प्रयत्न केले.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft