यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथील सभागृहे

प्रतिष्ठानची अद्ययावत सभागृहे आणि तेथे होणारे कार्यक्रम यामुळे यशवंतराव चव्हाण केंद्राची ओळख ही दक्षिण मुंबईमधील सांस्कृतीक, सामाजिक केंद्र अशी झाली आहे. ६५० आसनव्यवस्थेचे मुख्य सभागृह, २२५ आसनव्यवस्थेचे रंगस्वर आणि १५० आसन व्यवस्थेचे सांस्कृतिक सभागृह यांची उपलब्धता असल्यामुळे विविध प्रकारच्या कार्यक्रमांना आवश्यक सुविधा एकाच इमारतीमध्ये मिळतात.

मुख्य सभागृह
यशवंतराव चव्हाण केंद्रामधील सुसज्ज मुख्य सभागृह हे मुंबईमधील प्रमुख सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी असणारे ठिकाण आहे. शहरामध्ये उच्च दर्जाच्या सोयी आणि उत्तम व्यवस्था पुरवणा-या सभागृहांमध्ये हे सभागृह आघाडीवर आहे. एकूण ६५० आसन क्षमता असणा-या मुख्य सभागृहाचा वापर विविध कार्यक्रमांसाठी तसेच निरनिराळ्या सामाजिक संस्था, शासनातर्फे आयोजित केलेल्या सभा, संमेलने, चर्चा, परिसंवाद, चित्रपट, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, बैठका यांसाठी करण्यात येतो. मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी नाटके, संगीतसभा आदी कार्यक्रमांसाठी सभागृह भाडेतत्वावर देण्यात येते. वातानुकूलन यंत्रणा, आरामदायी खुर्च्या, अप्रतिम डॉल्बी डिजिटल साउंड सिस्टिम इत्यादी सुविधांनी मुख्य सभागृह सुसज्ज आहे.मुख्य सभागृहामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे यशवंतरावांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय पुरस्कार वितरण तसेच पुण्यतिथीदिनी राज्य पुरस्कारांचे वितरण, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.

रंगस्वर सभागृह
यशवंतराव चव्हाण केंद्रामधील चौथ्या मजल्यावरील रंगस्वर सभागृह सास्कृतीक कार्यक्रम, प्रायोगिक नाटके, परिषद, बैठक, याकरीता देखील आदर्श आहे. अद्यायावत ध्वनी व्यवस्था, भव्य व्यासपीठ यामुळे मध्यम आकाराच्या तरीही सुसज्ज सभागृहामध्ये रंगस्वर सभागृह अप्रतिम ठरले आहे. २२५ बैठकव्यवस्था असणा-या सभागृहामध्ये आवश्यकतेनुसार बैठक व्यवस्थेत बदल करण्याचे स्वातंत्र्य देखील या सभागृहामध्ये मिळते.रंगस्वर सभागृहामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे बैठका, चर्चासत्रे, कार्यशाळा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

सांस्कृतिक सभागृह
यशवंतराव चव्हाण केंद्रातील चौथ्या मजल्यावरील सांस्कृतिक सभागृह मर्यादीत व्यक्तींच्या कार्यक्रमासाठी आदर्श आहे. सभागृहामध्ये १५० व्यक्तींच्या बैठकीची व्यवस्था होऊ शकते. या सभागृहाच्या आकाराला साजेसे व्यासपीठ, आवश्यक ध्वनीव्यवस्था आणि विविध प्रकारच्या कार्यक्रमाकरीता आवश्यक सोयी उपलब्ध करून देता येतात. कार्यक्रमाच्या स्वरुपानुसार बैठक व्यवस्था व इतर सजावट करण्याचे स्वातंत्र्य या सभागृहात मिळते.
  

   

यशवंतराव चव्हाण केंद्र सभागृहे  

   

सभागृहाविषयी संपर्क  

श्री. विजय देसाई
सरव्यवस्थापक, सभागृहे
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- ०२२-२२०४७२५२ / ०२२-२२०४७२४८

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft