crear sitio web con WordPress

पुण्यात एक दृष्टीक्षेप कार्यशाळा..

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, अपंग कल्याण आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा उपंग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिव्यांग व्यक्तींसाठीचा कायदा-२०१६’ “एक दृष्टीक्षेप” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा ३१ जानेवारीला निसर्ग मंगल कार्यालय, शिवाजी पुतळ्याशेजारी, गुलटेकडी, मार्केटयार्ड, पुणे. येथे सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरू होईल.
या कार्यशाळेत नवीन कायद्या संबंधीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला या क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अपंग शाळेचे संघटनेचे प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती राहील. दिव्यांग व्यक्ती कायदा-२०१६ निर्मिती प्रक्रिया, त्याचा आशय, त्याची व्याप्ती, राज्यशासनाची नियमावली, अपंगत्वाचे प्रकार आणि धोरणात्मक अंमलबजावणी प्रक्रिया या विषयांवर मार्गदर्शपर चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती नंदकुमार फुले, प्रकल्प संचालक, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र पुणे यांनी दिली. कार्यक्रमांचे संयोजक विजय कान्हेकर हे आहेत.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft