crear sitio web con WordPress

   अपंग हक्क अभियान

महाराष्ट्रातील अपंग व्यक्तींच्या विविध समस्या संवाद व समन्वयाच्या भूमिकेतून सोडविण्यासाठी अपंग हक्क विकास मंचाची निर्मिती करण्यात आली. मंचाच्या निमंत्रक सौ. सुप्रिया सुळे आहेत. मंचाचे संयोजक श्री. विजय कान्हेकर व श्री दत्ता बाळसराफ हे काम पाहतात. या मंचामार्फत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात शिबीराचे आयोजन करुन सर्व प्रवर्गातील अपंगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व साहित्य साधनांसाठीचे मोजमाप घेऊन अपंगांना कृत्रिम अवयव व साधने मोफत उपलब्ध करून दिली जातात. तसेच या मंचामार्फत प्रत्येक अपंगांना त्यांच्या अपेक्षेनुसार योग्य ती माहिती पुरविली जाते. तसेच अपंगांना मदत करण्याचा आपल्या स्तरावरुन योग्य तो सहकार्य करण्याचा मंचाचा सतत प्रयत्न असतो. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने एडीप योजने अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व प्रवर्गातील अपंगांसाठी कृत्रिम अवयव व साधने वाटप शिबिरांचे आयोजन केले जाते.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft