crear sitio web con WordPress

कादंबरी अथवा आत्मचरित्र हे साहित्यांचे उपजत गुण आहेत - प्रा. फ. मु. शिंदे


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर आणि दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने "साहित्यिक आपल्या भेटीला" या विषयावरती मराठी भाषा विषय व कला विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात नूकतेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

विशेष म्हणजे ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मु. शिंदे हे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक होते. प्रारंभी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाचे प्रमुख डॉ. राजशेखर शिंदे यांनी केले.

विद्यार्थांशी संवाद साधताना शिंदे यांनी साहित्य विषयी आवड निर्माण होण्यासाठी विविध विषयांचा अभ्यास व त्याचे परीक्षण देखील विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने केलं पाहिजे हे सविस्तर सांगितले. एखादी कविता अथवा कादंबरी निर्माण होताना त्या लेखकाने अथवा कवीने विविध अंगाने त्याचा अभ्यास करून आणी जे आपल्याला सुचले, ते साहित्य रूपाने कसे मांडले पाहिजे, याबाबत सुध्दा माहिती दिली.

तसेच कथा आणि कादंबरी अथवा आत्मचरित्र हे साहित्यांचे उपजत गुण आहेत. त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीकडे आपली पाहण्याची दृष्टी खोलवर दृष्टी यावर सर्वकाही निगडीत असते. मराठी भाषा आपण जशी वळवावी तशी वळते पण कोणत्या प्रसंगी कोणत्या ढंगाने व अंगाने त्याचा उपयोग केला पाहिजे, यासाठी मराठी भाषेचे परिपूर्ण ज्ञान अवगत करण्यासाठी मराठी साहित्य तरुण पिढीने वाचणे गरजेचे आहे.

त्याचे रसग्रहण आपण कसे करावे त्याप्रमाणे तुमच्यातला साहित्यीक निर्माण होतो. या प्रसंगी अनेक विध्यार्थ्यांने फ. मु. शिंदे यांना वेगवेगळे प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन दूर केले. हा संवादाचा कार्यक्रम २ तास होता. महाविद्यालयाचे प्राचार्य व्हि. पी. उबाळे यांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार करण्यात आला, व अध्यक्षीय मनोगत प्राचार्यांनी केले, या कार्यक्रमास विभागीय केंद्राचे सचिव दिनेश शिंदे प्राध्यापक वर्ग व विध्यार्थी अधिक संख्येने उपस्थित होते.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft