crear sitio web con WordPress

१० वी, १२ बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मंत्र



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी विभागातर्फे १० वी आणि १२ बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चव्हाण सेंटरमध्ये नुकतेच मोफत करिअर मार्गदर्शन सेमीनारचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये व्यावसायिक मार्गदर्शन आणि निवड संस्थेच्या सल्लागार सुरेश सुरवडे सेमीनारमध्ये मार्गदर्शक म्हणून लाभले.

सुरुवातीला पालक आणि विद्यार्थी यांच्या मधला करिअर निवडण्या मधील गोंधळ विद्यार्थ्याना समजून सांगितला गेला. त्यानंतर विद्यार्थ्यांना अधिक मार्क मिळाले तर सायन्स साइटला जाण्यासाठी दबाव आणला जातो, अशा प्रकारची विविध उदाहरण सांगून विद्यार्थ्याना सुरवडे यांनी मार्गदर्शन केले.
कला, कॉमर्स, सायन्स हे निवड असतात काय प्रॉब्लेम असतात, आपला कल असेल तेच क्षेत्र निवडावे, आपल्याला ज्या क्षेत्राची आवड आहे अशाच क्षेत्रात जावे अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft