crear sitio web con WordPress

८ ऑक्टोबरला आनंद मेळावा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि फेस्कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑक्टोबर महिन्यामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंद मेळावाचे ८ ऑक्टोबर २०१७ रोजी आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये चार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार असून संवाद ज्येष्ठ नागरिक संघ या संघटनेचा सुध्दा सत्कार करण्यात येणार आहे. महिला ज्येष्ठ नागरिक श्रीमती उषा शंकरराव जाधव (चुन्नाभट्टी), डॉ. रेखा भातखंडे (माहिम), पुरूष ज्येष्ठ नागरिक श्री. वसंत मोरेश्र्वर टिल्लू (सायन), श्री. अनंत कृष्णा पाटिल (चुन्नाभट्टी) या चार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम प्रतिष्ठानचे सरचिटणीस व निवड समितीचे अध्यक्ष मा. श्री. श. गं. काळे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहूणे आहारतज्ज्ञ श्रीमती रेखा दिवेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

संगणकासंबंधी माहिती घेण्यासाठी इमारतीच्या तळ मजल्यावर खास व्यवस्था करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी त्याच लाभ घ्यावा. तसेच इमारतीच्या दुस-या मजल्यावर राष्ट्रीय स्वरूपाचे ग्रंथालय आहे. इच्छूकांनी ग्रंथालयाला भेटी देऊन त्याचा लाभ घ्यावा. मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिका या पूर्वीच पाठविण्यात आल्या आहेत.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft