crear sitio web con WordPress

परिसंवाद –चित्रपट; समाजदर्शन आणि ओम पुरी’

१९७२ साली घाशीराम कोतवाल या मराठी चित्रपटा पासून आपली अभिनय कारकीर्द सुरु करून आपल्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास १३० हून अधिक चित्रपटामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. हिंदी चित्रपटसृष्टी बरोबरच हॉलीवूड व ब्रिटीश चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली. रुढ अर्थाने हिंदी चित्रपटांसाठी गायक म्हणून हवा असणारा चेहरा नसताना देखील समांतर चित्रपट चळवळीला आपल्या समर्थ अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करून दिली. असे अभिनेते म्हणजेच ‘ओम पुरी’ होय. त्यांचे निधन होऊन येत्या ६ फेब्रुवारीला एक महिना होत आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘सिने-माँ क्रिएशन’ आणि रंगस्वर मुंबई यांच्या सहयोगाने ‘चित्रपट; समाजदर्शन आणि ओम पुरी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सदर कार्यक्रमात त्यांनी केलेले चित्रपट त्यातील भुमिका आणि प्रत्यक्षातील ओम पुरी यावर विशेषचर्चा होणार आहे. तसेच सिनेमा आणि त्याचा समाजावर पडणारा प्रभाव हा देखील या परिसंवादाचा विषय असणार आहे. प्रख्यात सिने-दिग्दर्शक श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, कुंदन शहा, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर व चित्रपटसृष्टीतील इतर मान्यवर या परिसंवादात भाग घेणार आहेत. नामवंत हिंदी चित्रपट लेखक व अभिनेते अतुल तिवारी हे या परिसंवादाचे समन्वयक असणार आहेत. सदर परिसंवादाचा कार्यक्रम ७ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ६.०० वा. रंगस्वर हॉल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नरीमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.

सिने-माँ क्रिएशन्स बद्दल काही 
सिने-माँ क्रिएशन हा काही तरुण चित्रपटकर्मीनी एकत्र येऊन स्थापना केलेला एक मंच आहे, जो फिल्मक्लब, कार्यशाळा, डॉक्युमेंटरी निर्माण तसेच चित्रपटासंबधी विविध विषयावरील परीसंवादाचे आयोजन, या माध्यमातून कला आणि समाज यांची सांगड घालून एक संवेदनशील समाजगट घडवू पहात आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी ७७४१८३८५५८ / ९८२९६७३९८३ संपर्क साधावा.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft