crear sitio web con WordPress

विनामूल्य आर्थिक गुंतवणूक मार्गदर्शन कार्यशाळा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ आणि संवेदन प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य आर्थिक गुंतवणूक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा गुरूवार ५ जुलै २०१८ रोजी दुपारी ३ ते ५ यावेळेत बेसमेंट सभागृह, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखाना जवळ,नरिमन पॉईंट, मुंबई होणार आहे.

कार्यशाळेतील या विषयांवरती वाढती महागाई आणि घटते व्याजदर , वाढत चाललेळे दाम दुप्पट फसव्या योजनांचे प्रमाण, इन्शुरन्स का घ्यावा? का घेऊ नये?, उत्पन्न प्रमाणे आर्थिक शिस्त कशी असावी, नियोजन करताना कसा विचार करावा, शेअर बाजार , म्यूचुअल फंड ह्या बाबत सखोल चर्चा, सिप म्हणजे नक्की काय?जेष्ठ नागरिकांच्या दर महिना खरचायला हवे असलेले पैसे आणि त्या पैस्याचा वाढीचा दर ह्याचा समतोल कसा साधावा,जागतिक गुंतवणूक गुरू वॉरेन बफेट ह्यांचे विचार आणि नियम, समृद्ध आर्थिक विकासाच्या दृष्टीने पाउल कसे टाकावे! चर्चा करण्यात येणार आहे. संपर्क - संजना पवार - भ्रमणध्वनी ८२९१४१६२१६ कार्यालय - २२०४५४६०, २२०२८५९८ (२२४)

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft