ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांना आदरांजली..‘ओम पुरी’ यांचे निधन होऊन येत्या ६ फेब्रुवारीला नुकताच महिना पूर्ण झाला. त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘सिने-माँ क्रिएशन’ आणि रंगस्वर मुंबई यांच्या सहयोगाने ‘यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ओम पुरी यांची पत्नी मुलांसह हजर होती, तसेच मराठी अभिनेते सचिन खेडेकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम नुकताच पार पडला.

सुरुवातीला आलेल्या मान्यवरांची ओळख करुण देण्यात आली, त्यानंतर ओम पूरी यांच्या त्यांनी केलेल्या अभिनय कारकिर्दी मध्ये बॉलीवुड आणि हॉलिवुड अशा दोन्ही प्रकारच्या चित्रफिती दाखवण्यात आल्या. त्यानंतर सीने-दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी त्याच्यासोबत बरेच चित्रपट केले आहेत, चित्रपट करत असतनाच्या आनंद, दुःख आणि आलेल्या समस्या याबाबत बऱ्याच गोष्टीचा उलगडा केला. ज्येष्ट पत्रकार कुमार केतकर यांनी त्यांच्यासोबत झालेली चर्चा, १९५० नंतरचा चित्रपटाचा काळ यावर सविस्तर चर्चा केली. गोविंद निहलानी यांनी त्यांच्यासोबत पूरी यांचे असलेले संबंध यांची माहिती देऊन बरेचशे त्यांचे स्वभाव गुण सांगितले. परिसवादाचे समन्वयक लेखक व अभिनेते अतुल तिवारी यांनी पुरी यांचा कॉलेज जीवनापासून ते आतापर्यंतचा पूर्ण जीवनपट सविस्तर उपस्थितांना समजावून दिली.

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft