रंगस्वरतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन....

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर विभागातर्फे फेब्रुवारी महिन्यामध्ये सहा विविध क्षेत्रामधील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, रंगस्वर, सभागृह चौथा येथे होतील. विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमास सर्वांना विनामूल्य प्रवेश असणार आहे.

शनिवार १८ फेब्रुवारी...'संतूर वादन'
शनिवारी १८ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता भीमसेन जोशी अध्यासन, ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि रंगस्वर यांच्याकडून संतूर वादन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये कलाकार निनाद दैठणकर, आणि गूरु डॉ. धनजय दैठणकर यांच्या वादनाचा अनुभव उपस्थिताना घेता येईल.

सोमवार २० फेब्रुवारी 'भरतनाट्यम नृत्य'..
सोमवारी २० फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० मि. इंडियन काउंसिल ऑफ कल्चर रिलेशन आणि रंगस्वरतर्फे भरतनाट्यम नृत्य हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये कलाकार विरजा आणि श्यामजीत किरण यांचे नृत्य पहाव्यास मिळेल.

गुरुवार २३ फेब्रुवारी 'माचिस'...
प्रभात चित्र मंडल आणि रंगस्वर यांच्या कडून माचिस हा कार्यक्रम गुरुवारी २३ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. आणि २८ फेब्रुवारीला सायकाळी साडेसहा एक संध्याकाळ जापानी लघुपटाची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच रविवारी २७ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहा वाजता सी. रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने गायक सी. रामचंद्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुरेश चांदवनकर असतील.

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft