‘डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ’पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन...

WhatsApp Image 2019 10 07 at 11.32.10 AM

मुंबई : दि. ७ : सर्व विद्यार्थांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचा विभाग शिक्षण विकास मंच मागील काही वर्षांपासून कार्यरत आहे. प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचाने आतापर्यंत अनेक परिषदा, कार्यशाळा आणि चर्चासत्रे चव्हाण सेंटर मध्ये आयोजित केली आहेत. तसेच शासनाला धोरणात्मक बदल करण्याच्या दृष्टीने शिफारशीही केल्या आहेत.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचतर्फे प्रतिवर्षी शैक्षणिक विषयक लिखाण केलेल्या उत्कृष्ट पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक यांना
‘डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ’पुरस्काराने सन्मानित केले जाते. यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचाकडून उत्कृष्ट शिक्षणविषयक पुस्तकं मागविण्यात आली आहेत. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाची गुणवत्ता, मूल्यमापन पध्दती, शालेय उपक्रम, समाजाचा सहभाग, शैक्षणिक प्रशासन अशा विषयांना स्पर्श करणारे हे पुस्तक असावे.
तसेच शैक्षणिक प्रश्नांवर उपाययोजना त्यात मांडलेल्या असाव्यात. हे पुस्तक दि. १ ऑक्टोबर २०१८ ते दि. ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत प्रकाशित झालेले असावे. तरी संबंधित प्रकाशकांनी/लेखकांनी सदर ग्रंथाच्या दोन प्रती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यालयात शनिवार दि. ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत शिक्षण विकास मंच, 
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर,मुंबई २१ येथे पाठवाव्यात अशी विनंती डॉ. वसंत काळपांडे मुख्य संयोजक शिक्षण विकास मंच यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : समन्वयक श्री. माधव सूर्यवंशी ९९६७५४६४९८.

शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान, डोंबिवली आयोजित पालक मेळावा

WhatsApp Image 2019 08 29 at 10.55.27 PM   

विषय :- निवड : शाळेची आणि माध्यमाची
रविवार,दिनांक १३ ऑक्टोबर २०१९
सकाळी १०:०० ते सायंकाळी ४:००
स्थळ : गांधीभवन, कोथरूड, पुणे.

पालक मेळाव्यामागील भूमिका
बदलती जीवनशैली,बदलतं जग,ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाच्या संपर्कात आलेले आपण आणि सर्वांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी भाषा म्हणजे इंग्रजी! आपल्या मुलांना चांगली इंग्रजी आलीच पाहिजे अशी सर्वच पालकांची तीव्र इच्छा असते, आणि ती रास्तच आहे. परंतु इंग्रजी माध्यमात शिकल्यानेच इंग्रजी भाषा येते असा गैरसमजही निर्माण झाला आहे. शिक्षक आणि पालक यांनी योग्य पद्धती वापरल्या तर इंग्रजी माध्यमात न शिकताच जास्त प्रभावीपणे इंग्रजी शिकणे शक्य आहे. त्यासाठी या दोन्ही घटकांचे उद्बोधन होणे आवश्यक आहे.
ज्या भाषेतून मुलांना सहजतेने अभिव्यक्त होता येते तीच भाषा शिक्षणाचे माध्यम म्हणून सर्वात चांगली. आपल्या पाल्याला आजच्या युगात अव्वल स्थानावर ठेवायचे असल्यास घरच्या/परिसर भाषेतून अर्थात मराठी माध्यमातून शिक्षण घेणे आणि त्याचबरोबर उत्तम इंग्रजी शिकवणे हाच पर्याय सर्वोत्तम आहे.
हाच माध्यमनिवडीचा विषय घेऊन आम्ही हा पालक मेळावा आयोजित करत आहोत.

सहभागी होऊ शकणारे पालक
(१) ज्यांनी माध्यमनिवड केली नाही,असे नवपालक
(२) ज्यांची मुले मराठी किंवा इंग्रजी माध्यमात शिकत आहेत,परंतु मनात माध्यम निवडीबद्दल संभ्रम आहे,असे पालक.
(३) इंग्रजी माध्यम निवडले आहे,परंतु त्याबाबत समाधानी नाहीत,असे पालक.
(४)इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमाकडे वळण्याची इच्छा

   

शिक्षण विकास मंच  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft