शिक्षण विकास मंच आयोजित शिक्षण परिषद
शालेय शिक्षण आणि वाचनसंस्कृती...

WhatsApp Image 2019 10 16 at 2.17.08 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षण परिषद आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी ही रविवार, दि. २४नोव्हेंबर २०१९रोजी आयोजित होईल.या दहाव्या वार्षिक परिषदेचा विषय शालेय शिक्षण आणि वाचनसंस्कृती असेल.
ही परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, रंगस्वर सभागृह, चौथा मजला, मंत्रालयासमोर, मुंबई येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत होईल.
या परिषदेत:-
वाचनसंस्कृतीचे महत्त्व
● वाचनसाहित्याचे विविध प्रकार
● वाचनसंस्कृतीची सद्यस्थिती
● वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी सुरू असलेले वाचन कट्ट्यासारखे विविध उपक्रम, चळवळी यांचा आढावा.
● वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी सूचना, नियोजन, अंमलबजावणीया विषयांवर प्रामुख्याने विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या संदर्भात चर्चा होईल.
या परिषदेत चर्चा सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पुस्तकप्रेमी प्रतिनिधींना पुढील लिंक उघडून नोंदणी करता येईल.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfyLJZMtiWRFboZnaTYMPwGAsOE2zv9RH5XTXaSXQkRsUVGYg/viewform?usp=sf_link

पालक मेळावा संपन्न

WhatsApp Image 2019 10 15 at 6.24.00 AM

 

निवड : शाळेची आणि माध्यमाची या विषयावर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान यांच्या वतीने १३ ऑक्टोबर २०१९ रोजी पुण्यातील गांधीभवन येथे पालक मेळावा संपन्न झाला. सुरुवातीला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यक्रम प्रमुख दत्ता बाळसराफ यांनी हा विषय ठेवण्यामागची भूमिका मांडली. सोबतच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान शैक्षणिक व इतर अन्य क्षेत्रात जे उल्लेखनीय कार्य करीत आहे त्या बाबतचे विवेचन केले. वैशाली सरवणकर यांनी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या कार्याची ओळख सर्वाना करून दिली.
यानंतर मेळाव्यास उपस्थित असलेल्या तीन पालकांनी प्रतिनिधीक स्वरूपात आपली मनोगते व्यक्त केली त्यातून सध्या पालक किती जागृत झाले आहेत हे दिसून आले. यानंतर मनोज खंडरे यांनी महाराष्ट्र व भारतातील इतर राज्ये यांची इंग्रजी माध्यमाचे प्रमाणात बाबत योग्य व सविस्तर माहिती दिली. यातून दक्षिण भारतात जसे साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे तसे इंग्रजीतून शिकणाऱ्यांचेही प्रमाण जास्त आहे, असे निरीक्षण मांडले. अजित तिजोरे सर यांनी जि. प. तसेच मराठी माध्यमाच्या शाळेमधून शिकलेल्या कर्तबगार तरुण तरुणींचे सादरीकरण केले.

   

शिक्षण विकास मंच  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft