शालेय शिक्षणात वाचन संस्कृती वाढावी...

WhatsApp Image 2019 11 24 at 7.06.39 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, शिक्षण विकास मंच आयोजित १० वी राज्यस्तरीय शिक्षण परिषद आज मुंबई येथे शालेय शिक्षण आणि वाचनसंस्कृती या विषयावर वर संपन्न झाली.
शिक्षण विकास मंच च्या एकूण कामाचा आढावा मुख्य सल्लागार मा. बसंती रॉय यांनी घेतला. जेष्ठ शिक्षणतज्ञ आणि शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे प्रास्ताविक मांडून हा विषय घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली. ग्रंथालीचे संस्थापक मा. दिनकर गांगल यांनी परिषदेच्या विषयावर अनुभवात्मक बीजभाषण केले. वाचन संस्कृती का व कशी वाढेल? याचेही विवेचन केले. बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी लहान मुलांचे वाचन यावर उपस्थितांशी दिलखुलास संवाद साधला. यानंतर मुलांमध्ये वाचनाची आवड कशी वाढवावी..?’ या विषयावरील परिसंवादामुळे भरपूर काही शिकायला मिळालं. या परिसंवादात बालभारती किशोरचे संपादक सन्माननीय किरण केंद्रे, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र लांजेवार, गीतांजली देगावकर, अरविंद शिंगाडे आणि वयमच्या संपादिका शुभदा चौकर आदीच्या अनुभवसंपन्न चर्चेमुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यात नक्कीच यशस्वी होऊ, यासंदर्भातील समाधान निर्माण झाले.

डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार २०१९ जाहीर...

WhatsApp Image 2019 11 21 at 8.52.21 AM

शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्याकडून दरवर्षी उत्कृष्ट शैक्षणिक विषयांवरील पुस्तकांची निवड करून त्यांचे लेखक/संपादक आणि प्रकाशक यांना डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात येतो. २०१९ च्या डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कारासाठी पुढील दोन पुस्तकांची निवड समितीने एकमताने निवड केली आहे:-
१. पुस्तकाचे नाव:- मुलांचे ग्रंथालय,
    संपादक:- डॉ. मंजिरी निंबकर
    प्रकाशक:- ज्योत्स्ना प्रकाशन,पुणे
२. पुस्तकाचे नाव:- नवी पालकनीती
    लेखक :- रेणू दांडेकर
    प्रकाशक :- सुरेश एजन्सी,पुणे
पुरस्कार वितरण रविवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित होणाऱ्या शिक्षण परिषदेत उद्घाटनप्रसंगी (सकाळी १०.०० ते ११.३० या कालावधीत) मा. सुप्रिया सुळे, निमंत्रक, शिक्षण विकास मंच आणि कार्याध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. लेखक/संपादक यांना पाच हजार रुपये रोख, गौरवपत्र आणि स्मृतिचिन्ह तर प्रकाशकांना गौरवपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.
पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.

   

शिक्षण विकास मंच  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft