फिनलंडची शिक्षणपद्धती - प्रशिक्षण - कार्यशाळा

फिनलंड या देशाची शिक्षणपद्धती जगात सर्वोत्कृष्ट समजली जाते. या पद्धतीचे अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. हेरंब कुलकर्णी आणि डॉ. शिरीन कुलकर्णी सध्या भारतात आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई एक कार्यशाळा आयोजित करत आहे. या दोन्ही तज्ज्ञांचा परिचय आणि कार्यक्रमाचा तपशील सोबत जोडला आहे.
कार्यशाळेचा विषय: फिनलंडची शिक्षणपद्धती
दिनांक: (रविवार) ७जुलै, २०१९
वेळ: सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.००
स्थळ: गांधी भवन, कोथरूड, पुणे ४११०३८ 
कार्यशाळेसाठी प्रवेश मर्यादित असून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे शिक्षक, पालक, शैक्षणिक संस्थाचालक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षणप्रेमी यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

 

नवीन शैक्षणिक धोरण मसुदा २०१९ चर्चासत्र संपन्न...

IMG 20190615 WA0023

शिक्षणप्रेंमींनी शिक्षणाविषयी काही औपचारिक आणि काही अनौपचारिक पध्दतीने चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजेच शिक्षण विकास मंच चा 'शिक्षण कट्टा'. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई,शिक्षण विकास मंचच्या वतीने चर्चासत्र नवीन शैक्षणिक धोरण मसुदा २०१९ चे आयोजन करण्यात आले होते.या विषयाच्या अनुषंगाने बसंती रॉय यांनी प्रेझेंटेशन सादर केले. शैक्षणिक धोरणामध्ये कोणत्या तृटी आहेत, तसेच कोणत्या गोष्टी होणं गरजेच आहे यावर चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षक विकास मंचाचे संयोजक वसंत काळपांडे, दत्ता बाळसराफ , राज्यभरातील वेगवेगळ्या शाळा – कॉलेज आणि संस्थांमधील प्रतिनिधी उपस्थित होते.

   

शिक्षण विकास मंच  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft