"शिक्षण हक्क कायदा आणि गुणवत्ता"
शिक्षण विकास मंच, चव्हाण प्रतिष्ठान ,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'शिक्षणकट्टा' या उपक्रमांर्तगत नियमितपणे आयोजन केले जाते. यावेळी "शिक्षण हक्क कायदा आणि गुणवत्ता" या महत्वाच्या विषयासंदर्भात शिक्षणकट्टयावर चर्चा होणार आहे. या चर्चेस जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षण विकास मंचचे संयोजक डॉ. वसंतराव काळपांडे याची मुख्य उपस्थिती राहणार आहे. तरी या चर्चेसाठी मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षणतज्ज्ञ,पञकार ,पालक,विद्यार्थी यांची अधिक उपस्थिती असावी. या चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन शिक्षणकट्टयाच्या निमंत्रिका श्रीमती बसंती रॉय यांनी केले आहे. या कार्यक्रम बोर्ड रूम ,पाचवा मजला ,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मंञालयसमोर १५ जुलै रोजी शनिवारी दुपारी २ ते ५ या वेळेत होईल. माधव सूर्यवंशी (समन्वयक) ९९६७५४६४९८
शिक्षण विकास मंच तर्फे
‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम' याविषयावर चर्चासत्र संपन्न...
शिक्षणप्रेमींनी शिक्षणाविषयी काही औपचारिक आणि काही अनौपचारिक पद्धतीने चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजेच 'शिक्षणकट्टा या कार्यक्रमामध्ये शिक्षणतज्ज्ञ , मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार, पालक, विद्यार्थी यांना घेऊन हा कट्टा गेली पाच वर्ष सुरू आहे. यावेळी हा कट्टा बोर्ड रूम ,पाचवा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिक्षण कट्ट्यावर ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम 'ह्या विषयावर राज्यातून आलेल्या शिक्षक मंडळी कडून चर्चा करण्यात आली. सुरुवातीला चार शासन परिपत्राचे वाचन करण्यात आले. त्यानंतर त्याचे विश्लेषण करुन पटवून देण्यात आले. राज्यातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आज कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी प्रगत शिक्षणाबाबत बोलताना हा कार्यक्रम शाळास्तरावर कशा प्रकारे सुरु आहे, या कार्यक्रमामुळे शाळांमध्ये कोणते बदल दिसून येत आहेत, अंमलबजावणी करताना आलेले अनुभव अशी वेगवेगळ्या मुद्यावर चर्चा करण्यात आली यावेळी ‘शिक्षण विकास मंच’ चे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे यांची विशेष उपस्थिती होती.