डॉ कुमुद बन्सल विनम्र अभिवादन...

GW430


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अंतर्गत शिक्षणावर काम करणारी एक शाखा असावी म्हणून डॉ. कुमुद बन्सल यांनी डॉ. वसंतराव काळपांडे,श्रीमती बसंती रॉय याच्या मदतीने सन २००८ साली शासकीय सेवापूर्ती नंतर शिक्षण विकास मंचाच्या कामास सुरुवात केली. डॉ. कुमुद बन्सल यांच्या नेतृत्वात मंचाने शालेय शिक्षण गुणवत्तापूर्ण व्हावे म्हणून अनेक उपक्रम राबविले. अनेक चांगले निर्णय घेण्यासाठी शासनाला मदत केली. त्यांच्याच दूरदृष्टीकोनातून शिक्षणावर चर्चा करण्यासाठी "शिक्षणकट्टा " आम्ही सुरू केला . त्याचा विस्तार आता महाराष्ट्रभर झाला आहे. दरवर्षी शिक्षक दिन व शिक्षण परिषद त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय भरीवपणे साजरी केली जायची. मात्र आज हे कार्य त्यांच्याशिवाय सुरू आहे. हे कार्य व त्यांचा विचार असाच पुढे घेऊन जाणे ,हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
कुमुदजी आपलं नसणं हे आम्हांला नेहमीच जाणवत राहतं...
आपल्या पवित्र स्मृतीस पुनश्च अभिवादन.

नवीन शैक्षणिक धोरण मसुदा २०१९वर पुण्याच्या गांधीभवनात चर्चा संपन्न...

WhatsApp Image 2019 07 12 at 8.41.08 AM 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई, शिक्षण विकास मंच यांच्या वतीने सदरील शिक्षणकट्टयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेची सुरूवात जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक मा. डॉ. वसंतराव काळपांडे यांच्या प्रस्ताविकाने झाली. प्रास्ताविकात त्यांनी भारतीय शिक्षण पद्धती,आतापर्यंत आलेले आयोग त्याचा शिक्षणावर झालेला परिणाम,येऊ घातलेले नवीन शैक्षणिक धोरण यावर मुख्यत्वे मांडणी केली. सोबतच धोरण अंमलबजावणीसाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा आहे याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. यानंतर शिक्षण विकास मंचच्या मुख्य सल्लागार श्रीमती बसंती रॉय यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा आढावा घेतला यानंतर उपस्थित सदस्यांनी चर्चेत भाग घेतला.
चर्चेच्या सुरूवातीस प्रभाकर खाडिलकर यानी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच मिळावे. निवृत्त तज्ज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा शिक्षण व्यवस्थेतेने फायदा करून घ्यावा अशी सूचना केली. सोबतच अंगणवाडी - पूर्व प्राथमिक शिक्षण दर्जेदार असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यानंतर नीलिमा सप्रे यांनी शिक्षक प्रशिक्षण कसे राबविले जाणार..? प्रशिक्षण जबाबदारी शाळेवर द्यावी तसेच शिक्षकानी स्वतः आपला अभ्यासक्रम तयार करावा. सोबतच पालकांचे उद्बोधन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे कमलाकर महामुनी यांनी कला,क्रीडा शिक्षकांच्या जागा भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होते या धोरणातही याबाबत शंका कायम आहेत. विद्यार्थी शिक्षक होण्यास उत्सुक नाहीत,नाईलाजाने या क्षेत्रात येणारी संख्या वाढली आहे, यावर विचार व्हावा.

   

शिक्षण विकास मंच  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft